घरमहाराष्ट्रफोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ

फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ

Subscribe

पुणे न्यायालयाने फेटाळला क्लोजर रिपोर्ट

राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार येताच राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट देण्यात आली होती, परंतु यासंदर्भात पुणे पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काळात काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना खासदार संजय राऊत, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप करण्यात आले होते. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवला होता.

- Advertisement -

यानंतर पुण्याच्या बंडगार्डन आणि मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रश्मी शुक्ला केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून गेल्या. तरी याप्रकरणी पोलिसांनी त्यांना समन्स बजावून चौकशी केली. त्यामुळे शुक्ला यांच्यावर याप्रकरणी अटकेची टांगती तलवार होती.

परंतु शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच रश्मी शुक्ला यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. या क्लीन चिटनंतर रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -