घरमहाराष्ट्रस्मार्ट सिटी योजनेचं ५०० कोटींचं टेंडर ज्या क्रिस्टल कंपनीला दिलं ती कोणाची...

स्मार्ट सिटी योजनेचं ५०० कोटींचं टेंडर ज्या क्रिस्टल कंपनीला दिलं ती कोणाची जाहीर करा – संजय राऊत

Subscribe

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्मार्ट सिटी योजनेत ५०० ते ७०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. याबाबत त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पत्र लिहिलं होतं. दरम्यान, आज राऊत यांनी स्मार्ट सिटी योजनेचं ५०० कोटींचं टेंडर ज्या क्रिस्टल कंपनीला दिलं ती कंपनी कोणाची जाहीर करावं, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यात घोटाळ्यांचे आरोप होत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत यांनी घोटाळ्यांचे सत्र अजिबात सुरु नाही, जे घोटाळे आधिच्या सरकारने करुन ठेवलेले आहेत. ते घोटाळे आता हळूहळू बाहेर निघत आहेत, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

कालच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्मार्ट सिटी योजनेतला जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यात साधारण ७०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं. टेंडर देण्यासाठी कसे नियम मोडले, तोडले हे आम्ही बाहेर काढणार आहोत, असं राऊत म्हणाले. जे लोक भ्रष्टाचारावर सतत बोलतात. त्यांना वाटतं भ्रष्टाचार संपवावा या देशातला, राज्यातला…त्यांच्याकडे आम्ही हे प्रकरण पाठवलं आहे, त्यांनी अभ्यास करावा. ही क्रिस्टल कंपनी आहे ती कोणाची आहे हे जाहीर करावं. मग त्या कंपनीचे इतर काही घोटाळे आहेत ते आम्ही बाहेर काढणार, आम्ही ते करणार, असं राऊत यांनी सांगितलं.

भ्रष्टाचार हा कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा, पंथाचा नसतो, भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो. जे भ्रष्टाचाराविरोधात लढत असतात, नेतृत्त्व करतात त्यांनी सुद्धा राजकीय पक्ष पाहायचा नसतो. जरी माझ्या घरात भ्रष्टाचार असेल तरी सुद्धा त्यावर मी बोललं पाहिजे. मी योग्य ठिकाणी पाठवलं आहे. आम्हाला माहिती तक्रार कुठे करायची, कोणत्या पद्धतीने करायची. त्याच्याबरोबर कोणते कागद लावायचे. हे आम्हाला चांगलं माहिती आहे. ते आम्ही करणार आहोत. तरी देखील तज्ज्ञांचं मत जाणून घ्यायचं आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -