घरमहाराष्ट्रपूजा चव्हाणच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे; पंकजा मुंडे यांची मागणी

पूजा चव्हाणच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे; पंकजा मुंडे यांची मागणी

Subscribe

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनं सध्या राजकीय वातावरण तापलं चांगलच तापलं आहे. या प्रकरणावर आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी होती. तीच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर राजकीय वातवरण तापलं आहे. कारण या प्रकरणात भाजपने वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे. संजय राठोड हे शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे आता भाजपने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

परळीतील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात ७ फेब्रुवारीला तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या? असा प्रश्न भाजपच्या महिला आघाडीने उपस्थित केला आहे. यात आता पंकजा मुंडे यांनी देखील भाष्य केलं आहे. “पूजा चव्हाण या माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. या तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे,” असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, गृमंत्री अनिल देशमुख यांना देखील मेंशन केलं आहे.

- Advertisement -

कोण आहे पूजा चव्हाण?

ज्या तरुणीच्या आत्महत्येने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे ती पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती. परळीत तिचे आई-वडील राहतात. पूजाला ५ बहिणी आहेत. त्यापैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत. फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते. १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. पुण्यात ती भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्यासोबत भाड्याच्या घरामध्ये राहत होती. रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास आणि अरुण यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -