घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राच्या हिताचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील, प्रमोद सावंतांचे मोठे विधान

महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील, प्रमोद सावंतांचे मोठे विधान

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडण्याची वेळ आली आहे. मी मुख्यमंत्रीपदही सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटाला घातली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील, असं मोठं विधान भाजपाचे नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील भाजपाचे महत्त्वाचे नेतेमंडळी देखील या घडामोडींवर नजर ठेवून आहेत. मी याबद्दल काही बोलणार नाही. या साऱ्या घटना पाहता महाराष्ट्राच्या हिताचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस घेतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे जे निर्णय असतील ते निर्णय घेण्यास ते समर्थ आहेत, असं प्रमोद सावंत म्हणाले.

- Advertisement -

बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन चर्चा केल्यास शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करेल. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. या साऱ्या गोंधळात भाजपाचे महत्त्वाचे नेते कुठे आहेत अशी चर्चा रंगली आहे.परंतु भाजपाचे नेते आणि फडणवीस हे सागर बंगल्यावर आपली रणनिती आखण्यात व्यस्त आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेनेतील पक्षांचे कार्यकर्ते आमदारांसोबत नसून पक्षासोबत असतात – जयंत पाटील


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -