घरताज्या घडामोडीशिवसेनेतील पक्षांचे कार्यकर्ते आमदारांसोबत नसून पक्षासोबत असतात - जयंत पाटील

शिवसेनेतील पक्षांचे कार्यकर्ते आमदारांसोबत नसून पक्षासोबत असतात – जयंत पाटील

Subscribe

शिवसेनेचा इतिहास आतापर्यंत असा आहे की, अनेकांनी पक्ष सोडला. पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षांचे कार्यकर्ते हे आमदारांसोबत नसून पक्षासोबत असतात. हे शिवसैनिकांनी अनेक वेळा दाखवून दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेत आमदार किती आहेत. त्याची आज चिंता करण्याची गरज शिवसेनेला नाही. संख्याबळ टिकवल्यानंतर आणि सरकार टिकवण्यासाठी त्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. परंतु त्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. गुवाहाटीमध्ये अडकलेले जे आमदार आहेत. त्यांनी मुंबईत येऊन बोलावे. त्यांच्या भावना व्यक्त केल्यानंतर त्यांची पाऊलं पडतील. जे गुवाहाटीला गेलेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. त्यांनी पक्ष सोडण्याचं कोणतही विधान केलं नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे, त्यांनी अंतर्गत चर्चा आणि विचार करुन केलं असेल त्यामुळे सध्या वेट आणि वॉच या भूमिकेत असल्याचं पाटलांनी सांगितलं आहे. वर्षा बंगल्यावरून मातोश्रीवर जाणं हे मुख्यमंत्र्यांनी वयक्तिक निर्णय घेतलेला आहे. सध्याची परिस्थिती पाहून त्यांनी तो निर्णय घेतला आहे. ते आजही मुख्यमंत्री आहेत. तसेच मातोश्रीवर राहून ते काम करत आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.


हेही वाचा : आम्ही विरोधी पक्षात बसण्यास तयार – नाना पटोले

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -