घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रब्रोकर असल्याचे भासवून गुंतवणुकदारांना ६४ लाखांना गंडा

ब्रोकर असल्याचे भासवून गुंतवणुकदारांना ६४ लाखांना गंडा

Subscribe

अ‍ॅक्युमेन व गुडवेल या शेअर मार्केट कंपनीचा ब्रोकर असल्याचे भासवून एकाने गुंतवणुकदारांना ६४ लाख ५० हजारांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक न करता संशयिताने रोकड परस्पर हडप केली असून, त्यापैकी काही रकमा परत केल्या आहेत. याप्रकरणी संजय सदानंद बिन्नर (रा.भगूर,देवळाली कॅम्प) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राहूल शंकर गौडा पाटील (३५ रा.बेळगाव,कर्नाटक) असे गंडा घालणाजया संशयीत ब्रोकरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित पाटील याने जनरल वैद्यनगर भागातील एका सोसायटीत आपले कार्यालयीन थाटून हा गंडा घातला आहे. तक्रारदार बिन्नर यांच्यासह सुमारे १३ जणांची या प्रकारात फसवणूक झाली आहे. अ‍ॅक्युमेन व गुडविल या दोन शेअर मार्केट कंपनीचा ब्रोकर असल्याचे प्रमाणपत्र दाखवून भामट्याने ही फसवणूक केली आहे. १ नोव्हेंबर २०२० ते ५ एप्रिल २०२१ या काळात संशयिताने गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करून ७५ लाख ४५ हजाराची रक्कम स्विकारीत गुंतवणूक केल्याचे भासविले होते. मात्र, गुंतवणुक न करता सदर रकमेचा त्याने अपहार केला. ही बाब निदर्शनास येताच गुंतवणुकदारांनी तगादा लावला असता त्याने ११ लाख एक हजार ५९७ रूपयांचा परतावा केला. मात्र, त्यानंतर टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसांपर्यंत आला असून ६४ लाख ४३ हजार ४०३ रूपयांची फसवणूक केल्याचे बिन्नर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास निरीक्षक चंद्रकात आहिरे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -