घरCORONA UPDATECoronavirus: पुण्यात कोरोनाने घेतला एकाच दिवशी तिघांचा बळी

Coronavirus: पुण्यात कोरोनाने घेतला एकाच दिवशी तिघांचा बळी

Subscribe

या तिघांचेही वय हे ६० वर्षांहून अधिक असून त्यापैकी दोन रूग्णांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता

देशभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात ७४८ कोरोनाग्रस्तांची संख्या असून मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे पुण्यात झालेल्या मृतांची संख्या आठ झाली असून मंगळवारी पुण्यात कोरोना व्हायरसने तीन कोरोनाग्रस्तांचा बळी घेतला आहे.

मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान या तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. या तिघांचेही वय हे ६० वर्षांहून अधिक असून त्यापैकी दोन रूग्णांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. देशात कोरोनाता शिरकाव झाल्यानंतर सुरूवातीला पुणे विभागात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण हे आढळून आले होते. रूग्णांचा आकडा लक्षात घेता प्रशासनाने योग्यवेळी खबरदारी घेतल्याने ही संख्या नियंत्रणात आली. काही रूग्ण हे योग्य उपचारानंतर घरी परतले मात्र मंगळवारी एकाच दिवशी तीन कोरोनाबाधितांचा मृ्त्यू झाल्याने पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या गंभीर परिस्थितीची दखल पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली आहे. यावेळी त्यांनी मोठा निर्णय घेत पुण्याचा पूर्व भाग पूर्णपणे सील करण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील काही भाग सील

पुण्यात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पुण्यातील काही भाग आणि त्याठिकाणची वर्दळ पुर्णपणे बंद असणार आहे. पूर्व पुण्याचे भवानी पेठ, नाना पेठ, कासेवाडी, गुलटेकडी, पुणे स्टेशन परिसर हे भाग पूर्णपणे सील करण्याचे आदेश पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले.

- Advertisement -

Coronavirus चा कहर: पुण्याचा पूर्व भाग सील; आयुक्तांचा मोठा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -