घरमहाराष्ट्रपुणे मिलिटरी स्कूल मारहाण प्रकरण; अखेर शिक्षकाला अटक

पुणे मिलिटरी स्कूल मारहाण प्रकरण; अखेर शिक्षकाला अटक

Subscribe

पुण्यातील श्री शिवाजी मिलिटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली आहे. चित्र न काढल्यामुळे विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली होती. विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली होती.

पुण्याच्या श्री शिवाजी मिलिटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीनंतर विद्यार्थ्याला अर्धांग वायूचा झटका आला. याप्रकरणी मिलिटरी स्कूलने शिक्षक संदीप गाडेला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले होते. मात्र आता या आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली होती. प्रसन्न पाटील या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी शिक्षक संदीप गाडे याला अटक केली आहे.

चित्र काढले नाही म्हणून मारहाण

दिवाळीची सुट्टी लागण्याआधी मिलिटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांना दिलेल्या अभ्यास तपासण्यात आला होता. मात्र प्रसन्नची चित्रकलेची वही अपूर्ण होती. चित्र का काढले नाही या छोट्याशा कारणावरुन शिक्षक संदीप गाडे याने प्रसन्नला मारहाण केली. या मारहाणीनंतर प्रसन्नला अर्धांगवायूचा झटका आला त्याचा उजवा भाग काम करत नाहीये. चित्र न काढल्यामुळे शिक्षकाने प्रसन्नला बँचवर उभे करुन त्याच्या तोंडावर आणि पोटावर फटके मारले. तसंच गळा दाबण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचे प्रसन्नने पालकांना सांगितले होते. प्रसन्नवर बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

- Advertisement -

आरोपी शिक्षकाला अटक

प्रसन्न श्री शिवाजी मिलिटरी स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकतो. प्रसन्नने कुटुंबियांना शिक्षकाने केलेल्या मारहाणीबद्दल सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या प्रसन्नच्या पालाकांनी सोमवारी मिलिटरी स्कूलमध्ये येऊन शिक्षकाला आणि स्कूलच्या व्यवस्थापकाला धारेवर धरले. याप्रकरणी प्रसन्नच्या पालकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षक संदीप गाडेविरोधात कारवाई करत मारहाणीच्या आरोपाखाली त्याला अटक केली.

संबंधित बातमी – 

मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -