घरमहाराष्ट्रपुणेEVM Machine: सासवडमधील तहसील कार्यालयातून EVM मशीनची चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

EVM Machine: सासवडमधील तहसील कार्यालयातून EVM मशीनची चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

पुणे शहरातील सासवडमध्ये चोरट्यांनी EVM मशीन चोरलं आहे. सासवडमधील तहसील कार्यालयातून चोरट्यांनी हे EVM मशीन चोरलं आहे.

पुणे: पुणे शहरातील सासवडमध्ये चोरट्यांनी EVM मशीन चोरलं आहे. सासवडमधील तहसील कार्यालयातून चोरट्यांनी हे EVM मशीन चोरलं आहे. ईव्हीएम मशीन चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 40 ईव्हीएम मशीन तपासण्यासाठी तहसील कार्यालयाच्या स्ट्रॉंग रुममध्ये ठेवल्या होत्या. त्यापैकी एका मशीनची चोरी करण्यात आली आहे. सासवड पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (EVM Machine Theft of EVM Machine from Tehsil Office in Saswad A case has been registered against an unknown person)

समोर आलेल्या माहितीनुसार, दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रुमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढलून आलं. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएममशीनमधून एक ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचं त्यांना समजलं. ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेले ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -

(हेही वाचा: Sanjay Raut : “रेल्वे भारताची संपत्ती, कोणाच्या…”, भाजपाच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -