घरमहाराष्ट्रचक्क राहुल गांधींनी घासली भांडी

चक्क राहुल गांधींनी घासली भांडी

Subscribe

देशात राष्ट्रपिता महात्मा गांधींची १५० वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. या दिवशी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माहात्मा गांधींच्या जीवनात स्वच्छतेचे एक विशेष महत्व होते म्हणून आज स्वच्छतेवर भर देण्यात आला. महात्मा गांधी जे बोलत होते ते करत होते. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात आज काँग्रेसच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी उपस्थीती लावली. कार्यक्रमात जेवल्यानंतर राहुल आणि सोनिया गांधीनी चक्क जेवणाची भांडी घासली. भांडी घासल्याच्या वेळी त्यांच्या बरोबर अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते. रांगेत उभे राहुन गांधींनी भांडे घासल्यामुळे ही राजकीय स्टंटबाजी असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमात केलेल्या भाषणादरम्यान त्यांनी पुन्हा मोदी सरकारवर निशाना साधला.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भांडी घसण्याचा व्हिडिओ ट्विटरवर टाकण्यात आला. राजकीय नेत खऱ्या अर्थाने भांडी घासतात की फक्त हा एक राजकीय स्टंट आहे यावर प्रश्न निर्माण होत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -