घरमहाराष्ट्रराहुल गांधींच्या रॅलीला परवानगी नाही, काँग्रेसची पालिका, मुंबई पोलिसांविरोधात हायकोर्टात धाव

राहुल गांधींच्या रॅलीला परवानगी नाही, काँग्रेसची पालिका, मुंबई पोलिसांविरोधात हायकोर्टात धाव

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची मुंबईत काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या दिवशी अर्थात २८ डिसेंबरला रॅली आणि जाहीर सभा होणार आहे. मात्र, या कार्यक्रमांना अद्याप मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आता मुंबई काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे.

आम्हाला समजत नाही की आम्हाला परवानगी का दिली जात नाही? जर त्यांना कोविडबद्दल काळजी वाटत असेल, तर आम्ही त्यांना आमच्या पत्रात आधीच सांगितलं आहे की आम्ही कोविड मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करू. जास्त वेळ शिल्लक नसल्याने आम्हाला परवानगीसाठी न्यायालयात जावं लागलं, असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.

- Advertisement -

येत्या २८ डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्यादिवशी राहुल गांधी पहिल्यांदाच शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. शिवाजी पार्कवर होणारी ही काँग्रेसची पहिली सभा नसली तरी राहुल गांधींची मात्र पहिलीच सभा आहे. यापूर्वी २००३ आणि २००६ मध्ये काँग्रेसची सभा सोनिया गांधींच्या नेतृत्वात झाली होती. त्यानंतर २०१८ मध्ये राहुल गांधींकरता या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागितली गेली. मात्र, त्यावेळी सभेला परवानगी नाकारण्यात आली होती.

- Advertisement -

राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी असली तरी मुंबई महानगरपालिकेत बिघाडी आहे. तथापि, शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर काँग्रेस-सेनेची वाढती जवळीक भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -