रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली, संचालक माहिती तंत्रज्ञान म्हणून नियुक्ती

निधी चौधरी यांच्या जागी महेंद्र कल्याणकर हे रायगडचे जिल्हाधिकारी पदाची सूत्र हाती घेतील.

Raigad District Collector Nidhi Choudhari has been posted as Director IT Mumbai
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली, संचालक माहिती तंत्रज्ञान म्हणून नियुक्ती

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी (Nidhi Choudhari) यांची बदली (Transfer) करण्यात आली आहे. निधी चौधरी यांना संचालक माहिती तंत्रज्ञान म्हणून मंत्रालयात नियुक्त करण्यात आलं आहे. तर निधी चौधरी यांच्या जागी महेंद्र कल्याणकर हे रायगडचे जिल्हाधिकारी पदाची सूत्र हाती घेतील. रायगड जिल्ह्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, निसर्ग चक्रीवादळ, तौत्के चक्रवादळ, महापूर, दरडी अशा आपत्तींमध्ये निधी चौधरी यांनी उत्तम कामगिरी करत परिस्थिती हाताळली आहे. निधी चौधरी यांचे काम सुरुळीत चालू असताना त्यांची अचानक बदली करण्यात आली आहे. चौधरी यांच्या बदलीमागे राजकारण सुरु आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. निधी चौधरी यांच्यासह ५ सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्हाधिकारी पदी १ जानेवारी २०२० मध्ये रुजू झाल्या आहेत. निधी चौधरी यांनी जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना यशस्वीरित्या केला आहे. आपत्तीजनक परिस्थितीमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजना आणि घेतलेल्या निर्णयांमुळे निधी चौधरी याचं काम राज्यात चर्चिले जात होते. मात्र त्यांची बदली केल्यामुळे डॉ. महेंद्र कल्याणकर हे रायगड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी असतील. निधी चौधरी यांना संचालक माहिती तंत्रज्ञान म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. निधी चौधरी यांना जिल्हाधिकारी पदावरुन हटवण्यामागे राजकारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

निधी चौधरी यांच्या पाठोपाठ ठाण्याचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त संजय मीना यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना गडचिरोली जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे. संजय मीना यांना मुंबईच्या बाहेर पाठवण्यात आलं आहे. संजय मीना यांच्या जागी महेंद्र वार भुवन यांना ठाण्याच्या आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महेंद्र वार भुवन मंत्रालयात सामान्य प्रशास विभागात सह सचिव होते. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी असलेले दिपक सिंगला यांची बदली विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. एकूणच या अधिकाऱ्यांची बदली पाहता या बदल्यांमध्ये राजकारण असल्याचे दिसतं आहे.

रायगड जिल्ह्यात उत्तम निर्णय आणि योग्य उपाययोजना करुन आपत्ती परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करणाऱ्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची अचानक बदली झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.