घरमहाराष्ट्रलोकांच्या अंगात शिवराय येईल तेव्हा आपण..., राज ठाकरेंनी ऐकवलं डॉ.आंबेडकरांचं वाक्य

लोकांच्या अंगात शिवराय येईल तेव्हा आपण…, राज ठाकरेंनी ऐकवलं डॉ.आंबेडकरांचं वाक्य

Subscribe

मुंबई – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली. त्यानंतर, त्यांनी एक अप्रतिम व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी डॉ.बाबासाहेबांचं एक वाक्य म्हटलं आहे.

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पदर; राज ठाकरेंकडून अभिवादन

- Advertisement -

‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आमच्या लोकांच्या अंगामध्ये म्हणे देवी येते, भूतं येतात, सगळ्या गोष्टी होतात. ज्या दिवशी लोकांच्या, समाजाच्या अंगात शिवाजी येईला ना तेव्हा आपण अख्खं जग पादाक्रांत करू टाकून’, असं राज ठाकरे यांच्या एका भाषणातला व्हिडीओ राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून प्रदर्शित केला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफझल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरत स्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार, कृषी धोरण, राज्य कोष, वास्तू रचना, राज्य व्यवस्था, न्यायदान पद्धत अशी असंख्य गुण वैशिष्ट्य सांगता येतात. तसेच, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वालाही अनेक पदर आहेत, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. राज ठाकरेंनी फेसबुकवर याबाबत सकाळी पोस्ट शेअर केली होती.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -