अयोध्या दौऱ्याबाबत कार्यकर्त्यांनी बोलण्याचा शहाणपणा करु नये, राज ठाकरेंचे फर्मान

abu azami Support from brij bhushan to oppose Raj Thackeray's visit to Ayodhya

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना न बोलण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकीय वाद सुरु झाला आहे. यावर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वक्तव्य करण्यात येत आहे. परंतु प्रवक्तेच दौऱ्याबाबत बोलतील असे राज ठाकरे यांनी सांगितले असून कोणीही बोलण्याचा शहाणपणा करु नये असे आदेशच राज ठाकरेंनी दिले आहेत. तसेच प्रवक्त्यांनीसुद्धा जबाबदारीने बोलावे असे राज ठाकरेंनी सांगितले आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मनसैनिकांना सूचना दिल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. यानंतर त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी जोरदार सुरु झाली आहे. परंतु अयोध्या दौऱ्यावरुन टीका देखील सुरु झाल्या आहेत. अयोध्या दौरा करुन देणार नाही तसेच अयोध्यात राज ठाकरेंना येऊ देणार नाही अशी घोषणा भाजप खासदाराने केली आहे. यावर मनसैनिकांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान राज ठाकरेंनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करुन कार्यकर्त्यांना आदेश आणि तंबी दिली आहे. दौऱ्याबाबत फक्त प्रवक्तेच बोलतील असे राज ठाकरे यांनी सांगितले असून कोणीही बोलण्याचा शहाणपणा करु नये अशी तंबीच दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून असे म्हटलं आहे की, माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत. ते याबाबत बोलतील इतर कुणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करु नये. तसेच इतरही कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे. त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

मनसैनिकाचा यूपीतील भाजप खासदाराला फोन

कैसरगंजचे खासदार आणि भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. या खासदारांना महाराष्ट्रातील मनसैनिकाने फोन केला होता. राज ठाकरेंना विरोध करण्यापूर्वी मुख्यमंत्री योगींचा सल्ला घ्या असे मनसैनिकाने सांगितले आहे. यानंतर राज ठाकरे यांच्याकडून एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये कार्यकर्त्यांना न बोलण्याची सूचना दिली आहे.


हेही वाचा : बोईसरमध्ये कंपनीतील दोन गटात तुफान दगडफेक, १० पोलिसांसह कामगार जखमी