Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

mumbai local mega block update Mega Block on Central and Harbor line
Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाची माहिती आहे. लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक राहणार आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक करण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर 11 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर मेगाब्लॉक राहणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई ते वैतरणा मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेवर परिणाम झाला आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड – वेळ सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 दरम्यान मेगाब्लॉक असेल. सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे ते हार्बर लाईन सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलहून सुटणारी ते हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.

पश्चिम रेल्वेवर पश्चिम रेल्वेवर वसई ते वैतरणा मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. शनिवारी-रविवार मेगाब्लॉक असून रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते डहाणू रोड या उपनगरीय विभागातील वाणगाव-डहाणू रोडदरम्यान उड्डाणपुलाच्या कामासाठी आज रविवारी पहाटेपासून दुपारी 1.30 पर्यंत आठ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. काही गाड्या रद्द सुद्धा करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत ट्रेन क्रमांक 09101 विरार-भरूच MEMU 15 मिनिटे उशीराने निघेल आणि त्यामुळे ती विरारहून 04:35 वाजता नियोजित सुटण्याऐवजी 04:50 वाजता निघेल.


हेही वाचा : राणा दाम्पत्याला जेलमध्ये दिलेली वागणूक गंभीर, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा