घरताज्या घडामोडी'जंत पाटील' चकीत चंदूसारखे असतात, राज ठाकरेंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली

‘जंत पाटील’ चकीत चंदूसारखे असतात, राज ठाकरेंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाचा जंत पाटील म्हणून उल्लेख केला आहे. जंत पाटील नेहमी चकीतचंदू सारखे असतात अशी मिश्किल टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तर सभेत केली आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील विकासकामांचे कौतुक केल्यामुळे जयंत पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. यावरुन राज ठाकरेंनी जयंत पाटील यांना खडेबोल सुनावले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर घणाघात केला आहे. जंत पाटील म्हणतात (जयंत पाटील) हे कधी गेले होते यूपीमध्ये ज्यांना आता यूपीचे कौतुक वाटतं. त्यांनी माझे भाषण एकदा ऐकावं, मी म्हटलं ज्या बातम्या कानावर येत आहेत त्याप्रमाणे यूपीत विकास झाला असेल तर मला आनंद आहे. माझी भाषा ही जर तरची आहे. तुम्हाला आठवत असेल तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सतत म्हणत होतो नरेंद्र मोदी पीएम होतील ते झाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्याचा विकास करावा, या तीन राज्यांतून जी लोकं महाराष्ट्रात येतात त्यांचे ओझं महाराष्ट्र सहन करु शकत नाही. माझी सगळी भाषणे काढून पाहा.

- Advertisement -

राज ठाकरेंची जयंत पाटलांवर टीका

संपलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार येऊन बघा हा काय संपलेला पक्ष आहे का, म्हणे विझलेला पक्ष आहे. जंतराव (जयंतराव) हा विझलेला पक्ष नाही तर समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे. माझ्या अक्षरावर थोडं इकडे तिकडे झाले असेल तर पाहून घ्या. हे काय सांगत आहेत. यांच्या मतदारसंघाच्या बाहेर कोणी विचारत नाहीत. मला सांगतात यांचे आमदार काय आमदार कुठे झाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा निवडून येणाऱ्य आमदारांचा, उमेदवारांची मोळी आहे. निवडून येणाऱ्या आमदारांची मोळी बांधलेली आहे. त्याची रस्सी फक्त शरद पवार आहेत. ही माणसे कोणत्याही पक्षात गेली तरी निवडून येतील.


हेही वाचा : राज्यात नेत्यांवर छापे पडल्यानंतर शरद पवार पंतप्रधान मोदींची भेट घेतात, राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -