घरताज्या घडामोडीशरद पवारांना मराठा म्हणून भेटत नाही, जातीच्या मुद्द्यावर राज ठाकरे स्पष्टच बोलले

शरद पवारांना मराठा म्हणून भेटत नाही, जातीच्या मुद्द्यावर राज ठाकरे स्पष्टच बोलले

Subscribe

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार त्यांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने का करत नाहीत?

बाबासाहेब पुरंदरेंना मी इतिहास संशोधक म्हणून भेटतो, ब्राम्हण म्हणून नाही. शरद पवार यांना मी मराठा म्हणून भेटत नाही. असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना प्रबोधनकार यांचं लिखाण वाचावं असा सल्ला दिला आहे. पवार यांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्याला पाहिजे तेवढं प्रबोधन ठाकरेंचं घ्यायचे आणि बाकीचं घ्यायचं नाही असं चालणार नाही असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी जे बोललो ह्याचा प्रबोधनकार ठाकरे माझ्या आजोबांनी लिहिलेल्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजावून सांगावं असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, बाबासाहेब पुरंदरेंना मी इतिहास संशोधक म्हणून भेटतो, ब्राम्हण म्हणून जात नाही. शरद पवार यांना मी मराठा म्हणून भेटायला जात नाही. कुणाच्याही घरी आपण जात पाहून जात नाही. वॉर्डनिहाय आरक्षणापेक्षा स्त्री पुरुष हेच आरक्षण असलं पाहिजे. विरोध काय करणार, वरती जे ठरवतात तेच करावं लागतं. मी काय वाचतो आणि काय वाचायचं हे मला माहिती आहे. माझ्या पक्षाला माहिती आहे. मला मोजण्याचा प्रयत्न करु नये असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पवार छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरुवात करत नाहीत

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार त्यांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने का करत नाहीत? असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्ष फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.

माझा जन्म कडवट मराठी

मनसेचा झेंडा पक्षस्थापनेपासूनच माझ्या मनात होता. तो आणायचाच होता. कधी आणायाचा ते ठरलं आणि त्यानंतर एका दिवशी तो झेंडा आणला. माझा जन्म हा कडवट मराठी आणि कडवट हिंदुत्वावादी घरात झाला आहे. त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार तेच आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

प्रबोधनकार ठाकरे मी वाचलेत

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जाती जातींमध्ये जास्त निर्माण झाला. याच्या अगोदर प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान होता. जातीवर राजकारण होत होते. मात्र दुसऱ्या जातीबाबत द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर झाला असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे फक्त बोललो फक्त मी, या सगळ्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे वाचावे याचा अर्थच कळला नाही. प्रबोधनकार ठाकरे मी वाचलेत. त्यांची सगळी पुस्तके वाचली आहेत. त्यांचे संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढं प्रबोधन ठाकरेंचं घ्यायचे आणि बाकीचं घ्यायचं नाही असं चालणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मी प्रबोधनकार वाचलेत, त्यांचे संदर्भ त्या काळातले, राज ठाकरेंचं शरद पवार यांना प्रत्युत्तर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -