घरCORONA UPDATEपंतप्रधांनांच्या भाषणात आशेचा किरण नाही; दिवे लावून परिणाम होणार असेल तर लावा...

पंतप्रधांनांच्या भाषणात आशेचा किरण नाही; दिवे लावून परिणाम होणार असेल तर लावा – राज ठाकरे

Subscribe

पंतप्रधांनांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता. मात्र, तो दिसला नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत चिंता व्यक्त केली. काही लोकांना लॉकडाऊनचं गांभीर्य कळत नाही आहे. दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ५ एप्रिला रात्री ९ वाजता दिवे लावायला सांगितले आहेत. यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. पंतप्रधांनांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता. मात्र, तो दिसला नाही. जर दिवे लावून परिणाम होणार असेल तर दिवे लावा. काहीजणांनी लॉकडाऊनचं गांभीर्य घेतले नाही आहे. सगळी यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून सगळं करते तरी काहींना गांभिर्य नाही. इतकी शांतता मी ९२-९३ च्या दंगलीत देखील पाहीली नाही. या काळात काहीजण काळाबाजार करत आहेत. अशांना फोडलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. राज्य सरकार मेहनत घेत असताना काहीजण लॉकडाऊनचं उल्लंघन करत आहेत. लॉकडाऊनमुळे दिवस वाढले तर त्याचे पुढे परिणाम होतील, बेरोजगारी वाढेल. त्यामुळे सर्वांनी लॉकडाऊन गांभीर्याने घ्यावे, असं आवाहन केलं आहे. दरम्यान, हल्ली प्रत्येक गल्लीत डॉक्टर झाले आहे. कोण म्हणतं गोमूत्र प्या तर अजून काही. यांना आवर घाला.

आरोग्ययंत्रणेकडे दुर्लक्ष

रुग्णालयात व्हेंटीलेटरची कमतरता आहे. अनेक ठिकाणी मास्कचा तुटवडा आहे. आपण आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष केलं म्हणून हि वेळ आली आहे. आपण आरोग्य विभागाकाचा कदी विचारच केला नाही. मात्र, आता या लोकांच्या लक्षात आलं असेल.

- Advertisement -

पोलिसांवर हात उठतोच कसा?

काही ठिकाणी पोलिसांवर हात टाकल्यायचे प्रकार समोर येत आहेत. पोलिसांवर हात टाकण्याची यांची हिंमत तरी कशी होते? पोलिसांवर हात उचलणाऱ्याना फोडून काढणारे व्हीडीओ बाहेर आले पाहिजेत. सरकारला मी विनंती केली आहे की, कारवाई करा. अशा लोकांना सोडू नका. विकृतांविराोधात कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. पोलिसांचं खच्चिकरन करुन चालणार नाही. पोलीसांकडून चूका होतात. मात्र, ही वेळ नाही त्यांच्या चूका दाखवण्याची. १२-१२ तास ड्यूटी करतात ते. जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत. त्यांना लोकांनी सहकार्य करायला हवं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -