घरताज्या घडामोडी"अर्ध्या झाकलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो" राज ठाकरेंच्या भाषणाच्या सुरुवातीलाच पिकला हशा

“अर्ध्या झाकलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” राज ठाकरेंच्या भाषणाच्या सुरुवातीलाच पिकला हशा

Subscribe

आमची नातवंड, पतवंड तुमचा इतिहास ऐकतील - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी व्यासपीठावर भाषणाला सुरुवात केली आणि व्यासपीठावरील मान्यवरांसह उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला होता. राज ठाकरे यांनी मान्यवरांचे नाव भाषणाच्या सुरुवातीला नावं घेतली यानंतर उपस्थित “अर्ध्या झाकलेल्या अन अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” असे म्हटल्यावर एकच हशा पिकला होता. राज ठाकरेंसह मंचावरील अन्य नागरिकही विनामास्क होते.

राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतक महोत्सवी कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंबाबत काही जुने किस्से सांगितले. मात्र भाषणाची सुरुवात राज ठाकरे यांनी चांगलीच रंजक अशी केली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह मंचावर अनेक व्यक्तींनी मास्क घातला नव्हता. तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काही लोकांनी मास्क परिधान केला होता. या मास्क घातलेल्या नागरिकांना संबोधताना राज ठाकरे यांनी “अर्ध्या झाकलेल्या अन अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” म्हटलं आणि एकच हशा पिकला.

- Advertisement -

राज ठाकरेंकडून आशाताईंचे कौतुक

राज ठाकरेंनी संबोधताना आशा भोसले यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. राज ठाकरेंनी मिश्किलपणे म्हटलं आहे की, कोण म्हणेल आशाताई ८८ वर्षांच्या आहेत. या वयातही काय दिसतात ना.. अशी चर्चा लोकांमध्ये सुरु होती. मी म्हटलं आपण जाहीरपणे सांगावं.. बासाहेब, आशाताई इथे मंचावर बसलेत आपण फक्त यांच्या वयाचे आकडे मोजायचे.. याच्यापलिकडे आपल्या हातात काही नाही असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आमची नातवंड, पतवंड तुमचा इतिहास ऐकतील

राज ठाकरे यांनी कार्यक्रमादम्यान म्हटलं आहे की, बाबासाहेबांची इतिहास सांगायची पद्धत आहे. ते तुम्हाला समजेल, रुचेल अशा पद्धतीने सांगतात. दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही. शिवचरित्र अनेकांनी लिहिलं. पण बाबासाहेबांनी ते घराघरात मनामनात पोहोचवलं, बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा, आमची नातवंड, पतवंड तुमच्याकडून असाच इतिहास ऐकत राहतील. अशाप्रकारे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान भावना व्यक्त केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -