घरमहाराष्ट्रराजन साळवी शिंदे गटाच्या वाटेवर? रत्नागिरीत उदय सामंत यांच्यासोबत तासभर खलबतं

राजन साळवी शिंदे गटाच्या वाटेवर? रत्नागिरीत उदय सामंत यांच्यासोबत तासभर खलबतं

Subscribe

रत्नागिरी – राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि ठाकरे गटात राहिलेले कोकणातील एकमेव आमदार राजन साळवी शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून जोर आला होता. आज, शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी राजन साळवी यांची रत्नागिरीत भेट घेतली. तब्बल तासभर चाललेल्या बैठकीत कोणत्या विषयासंदर्भांत चर्चा झाली याबाबत दोन्ही नेत्यांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कोकणात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.

राजन साळवी शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या काही दिवसांपूर्वी उठल्या होत्या. मात्र, आपण ठाकरे गटातच राहणार असून शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असल्याची भूमिका राजन साळवी यांनी स्पष्ट केली होती. त्यानंतर ते सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध कार्यक्रम आणि बैठकीत दिसले. मात्र, दुसरीकडे आज रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिंदे गटातील नेते उदय सामंत यांच्यासोबत राजन साळवी यांची भेट झाली. सध्या कोकणात अनेक विषय प्रलंबित आहेत. कोकणाचा विकास, रिफायनरी प्रकल्प याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली की शिंदे गटातील प्रवेशाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली याकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या बैठकीबाबत दोघांनाही विचारलं असता दोघांनीही माहिती देण्यास नकार दिला.

- Advertisement -

शिवसेनेचे निष्ठावंत खासदार गजानन कीर्तिकर यांनी कालच शिंदे गटात प्रवेश केला. गजानन कीर्तिकर यांच्यानिमित्ताने शिवसेनेत पुन्हा दुफळी माजलेली असताना राजन साळवी यांच्यामुळेही ठाकरे गटात पुन्हा कलह होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

राजन साळवी नाराज

- Advertisement -

राजन साळवी सध्या राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. पुढच्या निवडणुकीत त्यांना रत्नागिरी संगमेशवर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, रिफायनरी संदर्भात त्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांना मातोश्रीवर भेटायला बोलावले होते, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे रिफायनरीला समर्थन केल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांना खडसावल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राजन साळवी खरंच पक्षनिष्ठा सांभाळतात की वेगळा मार्ग पत्करतात हे पाहावं लागणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -