घरमहाराष्ट्रनागपूरRajendra Patni Passed Away: आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन; फडणवीसांकडून श्रद्धांजली

Rajendra Patni Passed Away: आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन; फडणवीसांकडून श्रद्धांजली

Subscribe

शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज निधन झालं. त्यापाठोपाठ राजेंद्र पाटणी यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं. राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी हे सुद्धा एकेकाळचे शिवसैनिक होते. त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. राजेंद्र पाटणी हे शिवसेनेकडून 1997 ते 2003 पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते.

मुंबई : भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज 23 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. राजेंद्र पाटणी हे कारंजा मतदारसंघाचे आमदार होते. पाटणी यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. (Rajendra Patni Passed Away MLA Rajendra Patni passed away Tributes from Fadnavis)

शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज निधन झालं. त्यापाठोपाठ राजेंद्र पाटणी यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं. राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी हे सुद्धा एकेकाळचे शिवसैनिक होते. त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. राजेंद्र पाटणी हे शिवसेनेकडून 1997 ते 2003 पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते.

- Advertisement -

शिवसेनेतून हकालपट्टी ते भाजपाचे आमदार

राजेंद्र सुखानंद पाटणी हे भाजपाचे आमदार होते. त्यांचा जन्म 19 जून 1964 रोजी झाला होता. 1997 ते 2003 पर्यंत ते विधान परिषदेचे शिवसेनेकडून आमदार निवडून गेले होते. 2004 ते 2009 पर्यंत ते वाशीमच्या कारंजा मतदार संघात विधानसभामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले होते. मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत 2011 मध्ये त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र 2014 च्या निवडणुकीत भाजपा शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले आणि भाजपाकडून कारंजा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत ते निवडून आले. त्यानंतर भाजपाकडून त्यांना जिल्हा अध्यक्षपद दिल्या गेले. 2019 मध्ये ते पुन्हा कारंजा मतदार संघात भाजप आमदार म्हणून निवडून गेले.

हेही वाचा : Manohar Joshi : बाळासाहेबांचं ते पत्र अन् मनोहर जोशींनी झटक्यात मुख्यमंत्री पदच सोडलं

- Advertisement -

दोनवेळा कोरोना आणि त्वचेचा कॅन्सर

भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांना दोनवेळा कोरोना झाला होता. त्याच दरम्यान किडनीचा आजार झाल्याने त्यांची किडनी काढण्यात आली होती. त्यानंतर त्यांना त्वचेचा कॅसर झाला. या सर्व आजारामुळे ते त्रस्त होते. गेल्या काही महिन्या पासून ते मुंबई येथील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. आज त्याचं सकाळी 9 वाजतादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा : Manohar Joshi : बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक हरपला, जाणून घ्या मनोहर जोशी यांचा जीवनप्रवास

देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट करत शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दांत फडणवीसांनी शोक व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -