Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी म्यूकर मायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करणार, राजेश टोपे यांनी दिली माहिती

म्यूकर मायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करणार, राजेश टोपे यांनी दिली माहिती

महात्मा ज्योतिबा फुले योजनेत सहभागी असणाऱ्याच रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे

Related Story

- Advertisement -

म्यूकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खसगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात एक स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. तसेच या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष तज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांचे पथक तयार करण्यात येणार असल्याचे टोपेंनी सांगितले आहे. राज्यात म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जलदगतीने उपचार करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. म्युकरमायोकसिसच्या वाढत्या प्रकरणांमुळे राज्य सरकारने स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना नंतर नवे आव्हान

कोरोनाचे संकट असताना आता म्युकर मायकोसिस आजाराचे नवे आव्हान समोर ठाकले आहे. त्यामुळे आता या रुग्णांवर उपचार करण्याची आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कान,नाक,घसा,तज्ज्ञ,नेत्ररोग तज्ज्ञ, न्युरोसर्जन,प्लास्टिक सर्जन यातील तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. परंतु एकाच रुग्णालयात हे सर्व डॉक्टर असतील असे नाही आहे. त्यामुळे मोठ्या आणि उपाचार करु शकतो अशा रुग्णालयात या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले योजनेत सहभागी असणाऱ्याच रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन उपचार करण्यासाठी आजच जी आर निघणार असून यासाठी प्रारंभी ३० कोटींची तरतूद केली जाणार असल्याचे टोपे म्हणाले. राज्यातील १७ जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संवाद साधणार असून याची पूर्वतयारी केली जात आहे. कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायसीसच्या उपचारासाठी टेंडर काढून एक लाख इंजेक्शन खरेदी करणार आहे, यातील ५ हजार इंजेक्शन प्राप्त झाले असून ते सायंकाळपर्यंत रुग्णासाठी वाटप केले जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -