…तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामनाचं संपादक बनवलं, संदीप देशपांडेंचा राऊतांवर हल्लाबोल

रिक्षावाला, पान टपरीवाला यांना शिवसेनेने संधी देत त्यांना आमदार केल्याचं संजय राऊत म्हणाले होते. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर टोला लगावला आहे.

sandeep deshpande

शिवसेनेतील ३८ बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत आपले बस्तान मांडले आहे. कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांना आता १२ जुलैपर्यंत पुढील सुनावणीची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी या बंडखोर आमदारांबाबत काल विविध वक्तव्ये केली होती. रिक्षावाला, पान टपरीवाला यांना शिवसेनेने संधी देत त्यांना आमदार केल्याचं संजय राऊत म्हणाले होते. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर टोला लगावला आहे. (Rajsaheb picked you up from there and made you the editor of the Samana, Sandeep Deshpande’s attack on Raut)

हेही वाचा – ज्यांचा आत्मा मेलाय त्यांच्याकडून निष्ठेची काय अपेक्षा ठेवणार? संजय राऊतांचा बंडखोरांवर पुन्हा हल्ला

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरीवाला, भाजी विकणारा, वॉचमन म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभामध्ये कारकून होते. तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामनाचे संपादक बनवलं.


“गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालवायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र ते आता पुन्हा पानटपरीवर बसतील. संदिपान भुमरे यांना पहिलं तिकीट मिळालं तेव्हा ते पैठणच्या साखर कारखान्यात वॅाचमन होते. मोरेश्वर सावेंचं तिकीट कापून बाळासाहेबांनी साधा शिवसैनिक म्हणून त्यांना तिकीट देण्यात आल होतं. तेव्हा त्यांना हॅाटेलमध्ये वडा-सांबर सुद्धा खाता येत नव्हतं. ते जमिनीवर बसून खायचे. मात्र, ते आज कॅबिनेट मंत्री आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यावर संदिप देशपांडे यांनी संजय राऊतांवर ट्विट करत टीका केली आहे.