घरताज्या घडामोडीजितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपचा आक्षेप, २ मतं बाद...

जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपचा आक्षेप, २ मतं बाद करण्याची मागणी

Subscribe

पक्ष प्रतोदांना आपण कोणाला मतदान करतो हे दाखवण्याची पद्धत आहे. परंतु मत पत्रिका कोणाच्या हातात देण्याची पद्धत नाही. त्यामुळे भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला आहे.

राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला १-१ मत महत्त्वाचे असताना भाजपकडून आता २ मत बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तसेच काँग्रेस नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची मतं ग्राह्य धरली जाऊ नये अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी मतांची आवश्यकता आहे. अशामध्ये भाजपने मतदानावर आक्षेप घेतल्यामुळे मविआची अडचण होऊ शकते. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांनी मत पत्रिका हातामध्ये नेऊन दिल्यामुळे भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आमदारांनी मतदान केलं आहे. आतापर्यंत २५० पेक्षा जास्त आमदारांचे मतदान झाले आहेत. राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे संजय पवार यांची उमेदवारी धोक्यात आहे. निवडणुकीत मतदान करताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतावर भाजप आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेत मत ग्राह्य धरु नये अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली आहे. तर मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हातात मत पत्रिका दिली आहे. दोन्ही सदस्य मंत्री आहेत. तसेच अशा प्रकारे मतदान करण्याची पद्धत नाही. पक्ष प्रतोदांना आपण कोणाला मतदान करतो हे दाखवण्याची पद्धत आहे. परंतु मत पत्रिका कोणाच्या हातात देण्याची पद्धत नाही. त्यामुळे भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला आहे.

मतदान मात्र ग्राह्यच

आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतल्यामुळे मतदान थांबवण्यात आले होते. यामध्ये नियमांची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. परंतु भाजपने आक्षेप घेतल्यामुळे मत बाद करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. जर ही दोन मते बाद झाली तर महाविकास आघाडीचे गणित बदलू शकते. शिवसेनेची जागा आहे ती धोक्यात येऊ शकते. परंतु नियमानुसार मतदान ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंच्या मत पत्रिकेवर आयोगाचा शिक्का नव्हता

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मत पत्रिकेवर निवडणूक आय़ोगाचा शिक्का नव्हता. आदित्य ठाकरे यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. परंतु त्यांच्या मत पत्रिकेवर आयोगाचा शिक्का नव्हता. त्यामुळे त्यांना दुसरी मत पत्रिका दिल्यानंतर त्यांनी आपले मत दिलं आहे. मत पत्रिकेवर आयोगाचा शिक्का नव्हता त्यामुळे ते मत ग्राह्य धरण्यात येणार नाही. मत पत्रिकेवर आयोगाचा शिक्का असेल तर मतदान ग्राह्य धरलं जाते.


हेही वाचा : मलिकांना मतदानासाठी तूर्त परवानगी नाहीच; फेरविचारासाठी पुन्हा याचिका करणार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -