स्वाभिमान छेडाल तर गप्प बसणार नाही, उदयनराजेंचा संजय राऊतांना इशारा

जघराण्याबद्दल कोणी बोललं तर त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन असं उदयनराजे भोसले म्हणाले. साताऱ्यात आयोजित केलेल्या बुलेट वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी छत्रपती घराण्याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावरून प्रचंड गदारोळ माजला होता. मात्र, उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. परंतु, आता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली असून राजघराण्याबद्दल कोणी बोललं तर त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन असं उदयनराजे भोसले म्हणाले. साताऱ्यात आयोजित केलेल्या बुलेट वितरण सोहळ्यात ते बोलत होते. (If you break you our self-esteem, we will not remain silent, Udayan Raje warns Sanjay Raut)

हेही वाचा – पानपट्टीवरील बिडी मिळते तशी ईडीची अवस्था, खासदार उदयनराजे भोसले यांचा हल्लाबोल

उदयनराजे भोसले म्हणाले की, कोण संजय राऊत हे मला माहित नाही. कोणाबद्दल आम्ही वाईट बोलत नाही. परंतु, आमच्याबद्दल कोणी वाईट बोललं तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन.

ते पुढे म्हणाले की, ‘स्वाभिमानाला छेडाल तर मी गप्प बसणार नाही. त्यांना बघायला वेळ लागणार नाही. कोणत्याही कुटुंबातील असला तरी त्याला स्वाभिमान असतो. स्वाभिमान छेडला तर बाकीचे गप्प बसतील. पण मी गप्प बसणार नाही. पुढची भूमिका बोलून दाखवत नाही. लोक बघतील काय करायचं ते, किती वेळ लागतो, असे खूप बघितले आहेत. आम्ही सर्वांचा सर्वांचा मान-सन्मान करतो, त्यांना कोणी अधिकारी दिला आमचा अपमान करायचा?’

हेही वाचा udayanraje : या जन्मीचे, याच जन्मी फेडाव लागत, पवारांवर उदयनराजेंची टीका

महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पृथ्वीराज पाटील याला उदयनराजे भोसले यांनी बुलेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानिमित्ताने आज सातारा येथे उदयनराजे यांनी जलमंदिर या निवासस्थानी बुलेट वितरणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे, पृथ्वीराज पाटील याला जी बुलेट उदयनराजेंकडून देण्यात आली त्या बुलेटला उदयनराजे यांचा खास ००७ हा नंबरही देण्यात आला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी राज्यातील राजकारणावरही भाष्य केलं. राज्यातील राजकारणात सध्या कुस्त्या सुरू आहेत. या कुस्त्या अगदी चिल्लर आहेत. खऱ्या कुस्त्या तर मातीतल्या असतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक स्कीम आहेत. या योजना कुस्तीपटू आणि खेळाडूंना नक्की फायदेशीर ठरतील, असं भोसले म्हणाले.