घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, १० जूनला होणार मतदान

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, १० जूनला होणार मतदान

Subscribe

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांवरील मतदानाची तारीख जाहीर करण्यात आला आली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून येत्या १० जूनला मतदान होणार असल्याची शक्यता आहे. उमेदवारांना ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. राजकीयदृष्ट्या ही निवडणूक फार महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकीसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यामुळे संभाजीराजेंचे आव्हान एका जागेसाठी राहणार आहेत.

महाराष्ट्रातील ६ खासदारांचा राज्यसभेवरील कार्यकाळ ३ मे रोजी संपु्ष्टात आला आहे. यामध्ये संजय राऊत, प्रफुल पटेल, पी.चिदंबरम, पियूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महतमे यांची मुदत संपली आहे. मुदत संपलेल्या खसादारांपैकी ३ खासदार भाजपचे तर ३ खासदार महाविकास आघाडीचे आहेत. यातील भाजपकडून राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना संधी देण्यात आली होती. परंतु संभाजीराजेंनी एकला चलोची भूमिका घेतल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

- Advertisement -

राज्यसभेच्या या ६ रिक्त जागा तात्काळ भरुन काढण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ राज्यातील ५७ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामधील महाराष्ट्रातील ६ जागा आहेत. अर्ज करण्याची शेवटची मुदत ३१ मार्चपर्यंत राहणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप खासदारांनी निवड बिनविरोध करण्याची शक्यता आहे. परंतु निवडणूक घेण्याची वेळ आली तर १० जूनला मतदान होऊ शकते.

शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफूल्ल पटेल, काँग्रेसकडून पी.चिदंबरम यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. तर भाजपकडून पीयूष गोयल केंद्रीय मंत्री असल्यामुळे पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकतात तर विनय सहस्त्रबुद्धे यांना पुन्हा संधी देण्यात येऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -