घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023गुणवत्ताधारक खेळाडूंची नियुक्ती प्रक्रिया रखडली, गिरीश महाजनांनी सांगितली 'अंदर की बात'

गुणवत्ताधारक खेळाडूंची नियुक्ती प्रक्रिया रखडली, गिरीश महाजनांनी सांगितली ‘अंदर की बात’

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | शासन निर्णयानुसार अनेक खेळाडूंना अद्यापही शासकीय नोकरीत रुजू करण्यात आलेले नाही. अनेक खेळाडूंनी यासंदर्भात शासनाकडे पाठपुरवा केलेला असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा दावा आमदार छगन भुजबळ यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – राज्यातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे. मात्र, असं असलं तरीही शासन निर्णयानुसार अनेक खेळाडूंना अद्यापही शासकीय नोकरीत रुजू करण्यात आलेले नाही. अनेक खेळाडूंनी यासंदर्भात शासनाकडे पाठपुरवा केलेला असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा दावा आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला. यावर क्रिडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

हेही वाचा – नितेश राणेंच्या धमकीवर संजय राऊत म्हणाले, “…त्यावेळी यांनी स्वतःला कोंडून घेतले होते”

- Advertisement -

२०१८ पासून क्रिडा धोरणानुसार सरकारी नोकरीतील थेट नियुक्ती धोरण सुधारित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची गिरीश महाजन यांनी दिली. धोरण सुधारित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने तेव्हापासून कोणतीही थेट नियुक्ती झालेली नसल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. तसंच, येत्या काही महिन्यांत या खेळाडूंना सरकारी सेवेत रुजू केलं जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

नाशिक जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू ऑलिम्पिअन कविता राऊत, रोईंगपटू दत्तू भोकनळ आणि आतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव उज्ज्वल केलेले आहे. त्यांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज केलेले असले तरीही त्यांना नोकरी मिळालेली नाही, हा मुद्दा छगन भुजबळांनी आज अधोरेखित केला.

- Advertisement -

यावर उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की, “कविता राऊत अ गटासाठी प्राप्त आहेत. त्यांना कॉमनवेल्थ पदक मिळालं तेव्हा त्यांच्याकडे पदवी नव्हती. त्यामुळे त्या गट क साठी पात्र ठरल्या. त्यामुळे त्यांना गट क साठी शिफारस करण्यात आली होती. पण त्या तेव्हा रुजू झाल्या नाहीत. २०१७ मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी नियुक्तीसाठी अर्ज केला. परंतु, २०१८ पासून थेट नियुक्ती धोरण सुधारित कार्यवाही सुरू झाली. त्यानंतर कोणालाही थेट नियुक्ती देण्यात आलेली नाही. या संदर्भात आता क्रिडा धोरण समिती नेमली आहे. २०१९ नंतर विशेष लक्ष न दिल्याने धोरण सुधारित झालेले नाहीत. पण आता हे धोरण लवकरात लवकर स्वीकारणार आहोत. त्यानंतर तत्काळ खेळाडूंना नोकरीत रुजू करण्यात येईल.”

कविता राऊत आणि दत्तू भोकनळ हे नियुक्तीसाठी प्राप्त आहेत. तर, अंजना ठमके या ज्युनिअर वर्गात मोडत असल्याने त्या सध्या नोकरीच्या निकषात बसत नाहीत, अशीही माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -