घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतलवारीचा धाक दाखवित टोल भरण्यास नकार; पुणे- नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर...

तलवारीचा धाक दाखवित टोल भरण्यास नकार; पुणे- नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर राडा

Subscribe

नाशिक : संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावरील कर्मचार्‍यास टोल भरणाच्या वादातून थेट उचलून आपटले. टोल भरण्यास नकार देत यावेळी 5 ते 6 जणांच्या टोळक्याने तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार( ता.२५) मार्च रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर योगेश सुभाष काळे हा तरूण नोकरीस आहे शनिवार रात्री तो टोलबूथवर टोल कलेक्टसाठी बसलेला असताना पाच ते सहा अनोळखी इसम तेथे आले टोल भरण्याच्या कारणावरून वाद घालू लागले, हे पाहून सुपरवायझर विलास राहणे व भागवत तेथे आले त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतांना छोटा हत्ती टेम्पोमधील इसमांनी गाडीच्या खाली उतरून आम्ही टोल भरणार नाही असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत विलास राहणे यांच्यासोबत झटापट केली.

- Advertisement -

काळे हे वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यांना एकाने उचलून थेट खालीच आपटले. त्यांच्या डाव्या हाताच्या कोपर्‍यास मार लागून हात मोडला. टेम्पोमध्ये बसलेला दुसरा इसम खाली उतरून योगेश काळेसह इतरांना धाक दाखविण्यासाठी तलवार घेऊन आला. याप्रकरणी योगेश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी ५ ते ६ अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १६७/ २०२३ भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२५, ३२३, ५०४, ५०६ आर्म अ‍ॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल ए.बी पारधी हे करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -