घरमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करून खंडणीची मागणी

धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करून खंडणीची मागणी

Subscribe

मेहुणीला मध्य प्रदेशातून अटक व पोलीस कोठडी

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून बहिणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खोटी तक्रार करून नंतर ती तक्रार मागे घेऊन त्यांच्याकडे 5 कोटी रुपयांसह महागडे मोबाईल, कमर्शियल शॉपसह इतर वस्तूंची मागणी केल्याप्रकरणी रेणू अशोक शर्मा हिला मध्य प्रदेशातील राहत्या घरातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला किल्ला कोर्टाने शनिवार 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

धनंजय मुंडे यांनी मेहुणी रेणू शर्माविरुद्ध खंडणी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी पुराव्यांसह तक्रार दिली होती. या संबंधी मलबार हील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते.

- Advertisement -

धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार, रेणू शर्मा हिने यापूर्वीही त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली होती, मात्र नंतरच्या काळात तिने ही तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेणू शर्माने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन केला. यावेळी तिने धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटी रुपयांचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास बदनामी करण्याची धमकी दिली होती.

या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये दिले होते. तसेच एक महागडा मोबाईलही पाठवला होता. मात्र, त्यानंतरही या रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याकडे ५ कोटी रुपयांसाठी तगादा लावला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी रेणू शर्माविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -