घरताज्या घडामोडीमोठी बातमी! ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदल, एकनाथ शिंदेंची खाती सुभाष देसाईंकडे

मोठी बातमी! ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदल, एकनाथ शिंदेंची खाती सुभाष देसाईंकडे

Subscribe

आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तेसाठी राजकारण सुरू आहे. शिवसेनेतील नेत्यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. दरम्यान, ३८ नेत्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच, मंत्रिमंडळातील अनेक नेते शिंदे गटात असल्याने राज्यातील अनेक कामे खोळंबली आहेत. राज्यातील जनतेला फटका बसू नये याकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खात्यांमध्ये फेरबदल केले आहेत. (Reshuffle of accounts in the state cabinet, a big decision of the Chief Minister)

जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नांवासमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री व राज्यमंत्री यांचेकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.

- Advertisement -

मंत्र्याकडील खातेवाटपात बदल :

  • नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) – सुभाष देसाई (आधी एकनाथ शिंदे)
  • पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग – अनिल परब (आधी गुलाबराव पाटील)
  • कृषि आणि माजी सैनिक कल्याण खाते, रोजगार हमी फलोत्पादन खाते – यशवंतराव गडाख (आधी दादाजी भुसे आणि संदिपान भुमरे अनुक्रमे)
  • उच्च व तंत्र शिक्षण खाते – आदित्य ठाकरे (आधी उदय सामंत)

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल:

गृहग्रामीण राज्यमंत्री – संजय बनसोडे (शंभुराज देसाई)

वित्त, नियोजन, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री – विश्वजित कदम (आधी  सतेज पाटील)

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री – विश्वजीत कदम (आधी राजेंद्र यड्रावकर)

वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग राज्यमंत्री – प्राजक्त तनपुरे (आधी राजेंद्र यड्रावकर)

अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री – सतेज पाटील (आधी राजेंद्र यड्रावकर)

सांस्कृतीक कार्य राज्यमंत्री – आदित तटकरे (आधी राजेंद्र यड्रावकर)

बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री – आदिती तटकरे (आधी अब्दुल सत्तार)

शालेय शिक्षण राज्यमंत्री – आदिती तटकरे (आधी बच्चू कडू)

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार राज्यमंत्री – आदिती तटकरे (आधी बच्चू कडू)

महसूल राज्यमंत्री – प्राजक्त तनपुरे (आधी अब्दुल सत्तार)

ग्रामविकास राज्यमंत्री – सतेज पाटील (आधी अब्दुल सत्तार)

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार – सतेज पाटील (आधी बच्चू कडू)

महिला व बालविकास राज्यमंत्री – संजय बनसोडे (आधी बच्चू कडू)

इतर मागास बहुजन कल्याण राज्यमंत्री – दत्तात्रय भरणे (आधी बच्चू कडू)

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -