घरताज्या घडामोडीमहसूल अधिकारी सोमवारपासून संपावर

महसूल अधिकारी सोमवारपासून संपावर

Subscribe

मार्च एण्डच्या कामावर होणार परिणाम

अवैध गौण खनिज कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांवर रेतीमाफीयांकडून जीवघेणे हल्ले होत असल्याच्या निषेधार्थ तसेच इतरही मागण्यांसदर्भात महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने ८ मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. याबाबत शासनाने ठोस पाऊले न उचलल्यास महसूली कामकाज ठप्प होउन याचा परिणाम मार्च एण्डच्या कामकाजावर होणार आहे.

यवतमाळ जिल्हयातील उमरखेड येथील नायब तहसिलदार वैभव पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. रेती वाहतुक करणारे रेतीमाफीया यांच्याकडून महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वारंवार जिवघेणे हल्ले होतात. संबधितांविरूध्द कारवाई न झाल्याने रेती माफीयांची मुजोरी वाढली आहे. यापुर्वीही अशा घटना घडल्या आहेत याकरीता अधिकार्‍यांना सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरविण्यात यावे अशी मागणी संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे नायब तहसिलदारांचा ग्रेड पे ४६०० रूपये करण्यात यावा. तहसिलदारांची ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आलेली नाही. अनेक अधिकार्‍यांकडे शासकीय वाहने उपलब्ध नाहीत त्यामुळे त्यांना तात्काळ वाहन उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागण्या महसूल मंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत यावर कारवाई न झाल्यास ८ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या उदिदष्टपुर्तीसाठी महसुल विभागाचीही धावपळ सुरू आहे. मात्र अधिकार्‍यांनी संप पुकारल्यास या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -