घरमहाराष्ट्रमला फसविण्याचे परमबीर सिंहांना बक्षीस; अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप

मला फसविण्याचे परमबीर सिंहांना बक्षीस; अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप

Subscribe

मला फसविण्यासाठी परमबीर सिंह याचा वापर करण्यात आला, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलेला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप राज्य सरकारवर केला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेत शिंदे-फडणवीस सरकारने विरोधकांना मोठा धक्का दिला. ज्यामुळे एकच खळबळ उडाली. मागील आठवड्यात राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचा दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. त्यांनी लिहिलेल्या एका पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती. तसेच त्यांना कारागृहात टाकण्यात आले होते. पण मला फसविण्यासाठी परमबीर सिंह याचा वापर करण्यात आला, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलेला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप राज्य सरकारवर केला. (Reward to Parambir Singh for deceiving me; Anil Deshmukh allegations against government)

हेही वाचा – त्र्यंबक प्रकरणाऐवजी कुरुलकर प्रकरणी SIT नेमा; संजय राऊतांचे सरकारला आव्हान

- Advertisement -

परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच मविआ सरकारच्या काळात गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांनी आपले याबाबत मत व्यक्त केले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, मला फसविण्यासाठी परमबीर सिंह याचा वापर करण्यात आला. त्याबदल्यात त्याला बक्षीस म्हणून त्याला जे मविआच्या काळात निलंबीत करण्यात आले होते, ते निलंबन मागे घेण्यात आले. याबाबत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमध्ये चर्चा होणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. आज राष्ट्रवादीची यशवंतराव चव्हाण येथे बैठक पार पडत आहे. या बैठकीत ते याबाबतचा मुद्दा मांडणार आहेत.

2021 मध्ये परमबीर सिंह यांनी ठाकरे सरकारला पाठवलेल्या एका लेटरमुळे मोठी खळबळ माजली होती. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचा आदेश दिला असा आरोप केला होता. त्यांच्या या पत्रामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. परमबीर सिंह यांच्या या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी देखील करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -