घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरRTO Report : शिंदे-फडणवीसांची गाडी अनफीट; विमानतळाहून अपघातस्थळाकडे करणार होते प्रवास

RTO Report : शिंदे-फडणवीसांची गाडी अनफीट; विमानतळाहून अपघातस्थळाकडे करणार होते प्रवास

Subscribe

नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा (Vidarbha Travels Bus) समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) भीषण अपघात झाला. या अपघातात बसने पेट घेतल्याने 26 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तसेच, 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची पाहाणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले.

नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा (Vidarbha Travels Bus) समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) भीषण अपघात झाला. या अपघातात बसने पेट घेतल्याने 26 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तसेच, 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची पाहाणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले. परंतु, संभाजीनगर विमानतळ येथून अपघातस्थळी जाण्यासाठी असणारी गाडी अनफीट असल्याची माहिती आरटीओने दिली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडींची आरटीओने तपासणी केली. त्यावेळी मुख्यमत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची गाडी अनफीट असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथे झालेल्या अपघाताच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समृद्धी महामार्गावरून जाणार होते. यासाठी विमानतळाहून शिंदे-फडणवीसांना अपघातस्थळी नेण्यासाठी आमदार लोगो असलेल्या दोन एसयुव्ही तयार ठेवण्यात आल्या होत्या. खबरदारी म्हणून आरटीओने या दोन्ही गाड्यांची तपासणी केली.

- Advertisement -

आरटीओने दोन्ही गाड्यांच्या टायरच्या तपासणीसह हेडलाईट, सीटबेल्ट, गाडी किती किमी चालली आहे, टायर कधी बदलले आहेत, सर्व्हिसिंग कधी केलेली आहे, ब्रेक नीट लागतायत का याची तपासणी करण्यात आली. यामध्ये एक गाडी अनफिट ठरविण्यात आली. ही कार जास्त किमी चालल्याने शिंदे, फडणवीस या गाडीतून जाऊ शकत नाहीत, असा रिपोर्ट आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला. यामुळे या कारच्या जागी दुसरी कार आणण्यात आली आहे. ती फिट असल्याने दोन कारमधून शिंदे, फडणवीस यांच्यासह सोबत आलेले अधिकारी अपघातस्थळी जाणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंकडून आर्थिक मदत जाहीर

या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्देवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -