राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात महाराष्ट्रातील भाजपनेच ट्रॅप रचला, सचिन सावतांची प्रतिक्रिया

Sachin Sawant allegation BJP in Maharashtra set the trap during Raj Thackeray's Ayodhya tour
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात महाराष्ट्रातील भाजपनेच ट्रॅप रचला, सचिन सावतांची प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्याची घोषणा केली होती. तसेच अयोध्येत मनसैनिकांवर केस दाखल करुन त्यांना जेलमध्ये सडवण्याचा ट्रॅप रचला गेला होता. माझ्या अयोध्या दौऱ्याविरोधात महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असे राज ठाकरे म्हणाले आहेत. यावर काँग्रेसचे नेते सचिन सावंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सांगितलेले सत्य ठरलं असून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी ट्रॅप भाजपनेच रचला असल्याचे राज ठाकरेंचेही मत आहे. असे सचिन सावंत म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये अयोध्या द ट्रॅप या चित्रपटाची गंभीर कहाणी सांगितली. या कहाणीचा रचयिता दुसरं तिसरं कोणी नसून भाजपच आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. एकंदरच त्यांनी असे म्हटलं आहे की, जर अयोध्या दौरा केला असता तर मनसैनिकांवर मोठ्या प्रमाणात केस टाकल्या असत्या, त्यांना जेलमध्ये सडवलं असतं. तर तिथे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार नाही. तिथे योगींचे भाजप सरकार आहे. भाजपच्या सरकारने मनसैनिकांना जेलमध्ये सडवलं असे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे तिथे विरोध करणारे भाजप खासदार आहेत. त्यामुळे जर महाराष्ट्रातून त्यांना कोणी रसद पुरवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो भाजपचा असेल असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

आम्ही यापूर्वी सांगितलेले सत्य आहे. राज ठाकरेंनी मान्य केलं आहे. त्यांच्या पक्षाची कुचंबना करण्याचे काम दुसरं तिसरं कोणी केलं नसून भाजपनेच केलं आहे. ज्या वेळी कळाले की, हिंदुत्वाच्या व्होटबँकमध्ये नवीन वाटेकरुन तयार होत आहे. तेव्हा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगाबाद सभेच्यापूर्वी काढता पाय घेतला. दुसरीकडे उत्तर भारतीय नागरिकांवर प्रभाव टाकण्यासाठी मनसेची जाणीवपूर्वक नामुष्की करण्यात आली आहे. भाजप किती कुटील कारस्थान करु शकतं हे अयोध्या दी ट्रॅप या चित्रपटाच्या कहाणीतून लोकांच्या समोर आलं आहे.

दरम्यान सचिन सावंत यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, मी सांगितले ते सत्य ठरले. “अयोध्येत गेलो असतो तर केसेस टाकल्या असत्या. कोणी? योगी सरकारने तीथे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही.” विरोध करणारा भाजपाचाच
हा ट्रॅप महाराष्ट्रातील भाजपनेच टाकला हे राज ठाकरे यांचेही मत आहे.


हेही वाचा : …म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, राज ठाकरेंनी सांगितलं ‘कारण’