भाजप- शिवसेनेच्या भांडणात दुसराच कोल्हा हित साधतोय, सदाभाऊंचा राष्ट्रवादीला टोला

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ मदत द्या

sadabhau khot criticizes maha vikas aghadi over rane conflict
भाजप- शिवसेनेच्या भांडणात दुसराच कोल्हा हित साधतोय, सदाभाऊंचा राष्ट्रवादीला टोला

भाजप आणि शिवसेनेच्या भांडणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन कोल्हे मजा बघतायत असा टोला रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राणेंना अटक आणि जामीन कारवाई करण्यात आली. यावरुन भाजप आणि शिवसेनेत तणापुर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या भाजपच्या आणि शिवसेनेमध्ये दरी वाढवण्याचे प्रयत्न काहीजण करत आहेत असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सरकार पुरस्कृत गोंधळ राज्यात घालण्यात आला असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणेंच्या अटकेवर भाष्य केलं आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे. या दोन राजकीय पक्षांच्या भांडणात दुसराच कोल्हा हित साधतोय असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. भाजप-सेना एकत्र येऊ नये यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची तयारी केली होती. तसंच अनिल परब यांनी करणं योग्य नाही असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

भाजप आणि शिवसेनेतील दरी वाढवण्याचे काम काही जण करत आहेत. महाराष्ट्रात अशी पुर्वीही अनेक वक्तव्य करण्यात आली आहेत. परंतु अशा दंगली कधी झाल्या नाहीत. हा गोंधळ सरकार पुरस्कृत होता. राज्यातील प्रश्न बाजुला ठेवून वेगळे प्रश्न तयार करण्याची ही सुरुवात असून ही एकप्रकारची खेळी असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

टोमॅटोला भाव द्या

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ मदत द्या जर सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलं नाही तर आंदोलन करु असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाव कोसळले असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. राज्य सरकारने केवळ घोषणा करु नये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारम्हणून पाठवलं आहे, तुम्हाला फायटर म्हणून पाठवलं नाही अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.


हेही वाचा : वेळ देऊनही राज्यपालांनी मविआ नेत्यांची भेट नाकारली; नाना पटोले यांचा आरोप