घरक्रीडाTokyo Paralympics : भारताची पॅरा टेबल टेनिसपटू सोनलबेन पटेलचा सलग दुसरा पराभव

Tokyo Paralympics : भारताची पॅरा टेबल टेनिसपटू सोनलबेन पटेलचा सलग दुसरा पराभव

Subscribe

भारताच्याच भाविना पटेलला मात्र विजय मिळवण्यात यश आले.

भारताची पॅरा-टेबल टेनिसपटू सोनलबेन पटेलला टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील महिला एकेरीच्या क्लास ३ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तिला दक्षिण कोरियाच्या ली मी-ग्युने ३-१ (१०-१२, ११-५, ११-३, ११-९) असे पराभूत केले. सोनलबेनने या सामन्याची चांगली सुरुवात करताना पहिला गेम जिंकला. परंतु, त्यानंतरच्या तीन गेममध्ये तिला चांगला खेळ करता आला नाही. त्याआधी बुधवारी सलामीच्या लढतीत तिचा चीनच्या क्वीन लीने २-३ (९-११, ११-३, १५-१७, ११-७, ११-४) असा पराभव केला होता.

- Advertisement -

भाविना पटेलची आगेकूच

गुरुवारी, भारताच्याच भाविना पटेलला मात्र विजय मिळवण्यात यश आले. तिने महिला एकेरी क्लास ३ च्या ‘अ’ गटात ग्रेट ब्रिटनच्या मेगन शॅकलटनवर ३-१ अशी मात केली. भाविनाने हा सामना ११-७, ९-११, १७-१५, १३-११ असा जिंकला. या सामन्याचा पहिला गेम जिंकल्यानंतर दुसरा गेम भाविनाने गमावला. परंतु, तिने पुन्हा खेळ उंचावत चुरशीच्या तिसऱ्या गेममध्ये १७-१५ अशी बाजी मारली. चौथ्या गेममध्ये शॅकलटनला विजयाची संधी होती. मात्र, भाविनाने दमदार पुनरागमन करत हा गेम १३-११ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

- Advertisement -

हेही वाचा – कोलकाता नाईट रायडर्स संघात कमिन्सची जागा घेणार न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -