घरमहाराष्ट्रSalman Khan: सलमान खान गोळीबारप्रकरणी फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Salman Khan: सलमान खान गोळीबारप्रकरणी फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रेस्थित घरावर आज, रविवारी पहाटे पाचच्या सुमारास दोन अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबार प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्यात आला आहे.

नागपूर: बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रेस्थित घरावर आज, रविवारी पहाटे पाचच्या सुमारास दोन अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबार प्रकरणाचा तपास ATS कडे सोपावण्यात आला आहे. तसंच, या घटनेची दखल राज्य सरकारने घेतली असून, सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली जाणार आहे. यासंदर्भात आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पोलीस या संदर्भात अधिक तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी गेले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. (Salman Khan Devendra Fadnavis first reaction to Salman Khan firing on house at Bandra )

काय म्हणाले फडणवीस? (Fadnavis on Salman Khan)

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलमान खान गोळीबार प्रकरणावर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. गोळीबार प्रकरणाची अधिक माहिती मिळाल्यावर त्यासंदर्भात तुम्हाला सांगितलं जाईल, असंही त्यांनी म्हटलं.

- Advertisement -

जयंत पाटील निराश (Fadnavis on Jayant Patil) 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संसदेला नमन करून संसदेत प्रवेश केला होता. ती संसदच पंतप्रधान मोदींनी बदलली, असा आरोप शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, जयंत पाटील हे निराश झाले आहेत. त्याच्यामुळे ते असं वक्तव्य करतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. खरं तर नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांना सर्व पक्षांनी पंतप्रधान म्हणून निवडलं तेव्हा सेंट्रल हॉलमध्ये संविधान ठेऊन त्याला नमस्कार करून, पूजा करून त्यांनी सर्व पक्षांचा नेता होणं स्वीकारलं, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा: Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; बिश्नोईवर संशय )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -