घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्ग, वंदे भारत एक्सप्रेस अन् एम्स नागपूरचं लोकार्पण

पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्ग, वंदे भारत एक्सप्रेस अन् एम्स नागपूरचं लोकार्पण

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी खुद्द मोदींनीही ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. मोदींनी यावेळी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.

- Advertisement -

समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे प्रकल्प हे पंतप्रधानांचे देशभरातील उत्तम कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांच्या व्हिजनला साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून 701 किलोमीटरचा हा एक्स्प्रेस वे बांधला जात आहे.

समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस मार्गांपैकी एक आहे, जो महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी भागांमधून जातो. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी गेम चेंजर ठरेल. हा एक्स्प्रेस वे आसपासच्या इतर 14 जिल्ह्यांचा संपर्क सुधारण्यास मदत करेल, असे पीएमओने एका निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यास मदत होईल.

- Advertisement -

पंतप्रधान गति शक्ती अंतर्गत पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन आणि समन्वित अंमलबजावणीच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला पाठिंबा देत, समृद्धी महामार्ग दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अजिंठा एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार इत्यादी पर्यटन स्थळांना जोडला जाणार आहे.

नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

दरम्यान मोदींनी नागपूर दाखल होत सर्वप्रथम वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा कंदील दाखवला आहे. ही ट्रेन नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणार आहे. यादरम्यान सुमारे 590 कोटी रुपये आणि 360 कोटी रुपये खर्चून पुनर्विकास करण्यात येणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधानांनी ‘नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा’ राष्ट्राला समर्पित केला. खापरी मेट्रो स्टेशनवर त्यांनी खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (ऑरेंज लाइन) आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर (एक्वा लाइन) या दोन मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधान मोदींनी नागपूर मेट्रोने फ्रीडम पार्क ते खापरी असा प्रवास केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नागपूर मेट्रोच्या फ्रीडम पार्क स्टेशनवर पंतप्रधानांनी तिकीट खरेदी केले.

नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8650 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. 6,700 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणाऱ्या नागपूर मेट्रो फेज-2 ची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

एम्स नागपूरचे उद्घाटन

आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते एम्स नागपूरचे उद्धाटन झाले आहे. नागपूर एम्समुळे देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेला आणखी बळ मिळेल. जुलै 2017 मध्ये पंतप्रधानांनी ज्या हॉस्पिटलची पायाभरणीही केली होती, ते केंद्रीय क्षेत्र योजना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत उभारण्यात आले आहे.

1575 कोटींहून अधिक खर्च करून विकसित केलेले एम्स नागपूर हे OPD, IPD, निदान सेवा, ऑपरेशन थिएटर्स आणि सर्व प्रमुख वैशिष्ट्य आणि सुपरस्पेशालिटी विषयांचा समावेश असलेले 38 विभागांसह अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय आहे. हे रुग्णालय महाराष्ट्राच्या विदर्भात आधुनिक आरोग्य सुविधा पुरवणार आहे, ज्यामुळे गडचिरोली, गोंदिया आणि मेळघाटच्या आसपासच्या आदिवासी भागांसाठी मोठे फायदेशीर ठरेल.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात आज एका जाहीर कार्यक्रमात आणखी तब्बल 1500 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्य़ात आले. यात राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नागपूर आणि नागपुरातील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी मोदींच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथील केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्थेचं उद्घाटन केले. त्याचबरोबर ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र, चंद्रपूर’चे लोकार्पणही करण्यात आले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -