घरमहाराष्ट्रसंदीप सिंह, भाजपच्या संबंंधांची चौकशी करण्याची विनंती सीबीआयला करणार

संदीप सिंह, भाजपच्या संबंंधांची चौकशी करण्याची विनंती सीबीआयला करणार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणारा संदीप सिंह आणि भाजप यांचे संबंध असून त्याची चौकशी करण्याची मागणी करणार्‍या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. काही जणांनी तशी विनंतीही केली आहे. त्याचा संबंध बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणाशीही आहे. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी करण्याची विनंती मी सीबीआयकडे करणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

शनिवारी मीडियाशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, संदीप सिंह आणि भाजपचे संबंध तपासण्याची अनेक निवेदन माझ्याकडे आली आहेत. त्यामुळे मी सीबीआयला या कनेक्शनचा तपास करण्यास सांगणार आहे.

- Advertisement -

संदीप सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवला होता. त्यामुळे संदीप सिंहचा भाजपाशी संबंध असल्याचा आरोप काँग्रेससह काही जणांनी केला असून, त्याची चौकशी करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. यासंदर्भात तक्रारी दाखल झाल्यानंतर संदीप सिंह आणि भाजपातील संबंधांचीही सीबीआय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती समोर येत असतानाच त्यावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. या प्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा उल्लेख झाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा मित्र संदीप सिंह यांनी सुशांतला अंमली पदार्थ दिल्याचा आरोप काही व्हॉट्सअ‍ॅपवरील संवादांचा आधार घेत करण्यात आला. त्यावरून भाजपाने आरोप केले होते. त्यानंतर काँग्रेससह काही जणांनी संदीप सिंह आणि भाजपा यांचे संबंध असल्याचा दावा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -