घरमहाराष्ट्रइंदुरीकर महाराज आज पुन्हा न्यायालयात; जामिनासाठी अर्ज करणार का? नेमकं प्रकरण काय?

इंदुरीकर महाराज आज पुन्हा न्यायालयात; जामिनासाठी अर्ज करणार का? नेमकं प्रकरण काय?

Subscribe

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, अपत्य प्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी PCPNDT कलमांतर्गत दाखल गुन्ह्याची आज संगमनेर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

संगमनेर: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, अपत्य प्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी PCPNDT कलमांतर्गत दाखल गुन्ह्याची आज संगमनेर न्यायालयात सुनावणी होणार आहे. समन्स न मिळाल्याने मागील महिन्यातील सुनावणीसाठी इंदुरीकर महाराज गैरहजर होते. त्यामुळे आजच्या सुनावणीसाठी ते स्वत: हजर राहून जामीनासाठी अर्ज करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Sangamner Indurikar Maharaj again in court today Will apply for bail What exactly is the case)

हायकोर्टाने हा खटला जिल्हा न्यायालयात पुन्हा चालवण्याचा आदेश दिला होता. तोच आदेश सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात संगमनेर कोर्टात हा खटला नव्याने सुरू झाला आहे. मागच्या महिन्यात कोर्टाने समन्स बजावूनही इंदुरीकर महाराज हजर झाले नव्हते. बजावलेलं समन्स इंदुरीकर महाराजांना मिळालंच नाही असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे ते आज तरी कोर्टात हजर राहणार का? हे पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

2020 साली इंदुरीकर महाराजांनी अपत्य प्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला. 2020 साली दाखल झालेल्या या गुन्ह्यात त्यांची निर्दोष मुक्ततादेखील करण्यात आली.

मात्र, या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारने या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने हा खटला जिल्हा न्यायालयात पुन्हा चालवण्याचा आदेश दिला. पुढे तोच आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला. त्यामुळे इंदुरीकर महाराजांविरोधात संगमनेर कोर्टात हा खटला नव्याने सुरू झाला आहे. तसंच, मागच्या महिन्यात समन्स बजावूनही इंदुरीकर महाराज सुनावणीला गैरहजर राहिले. दरम्यान आजच्या सुनावणीला ते कोर्टात हजर राहणार का, ते पाहावे लागणार आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगेन; पेडणेकरांनी आरोप फेटाळले, ED चौकशीसाठी दाखल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -