घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी षन्मुखानंद नाट्यगृहाचे दरवाजे आठवड्यापुर्वीच खुले

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी षन्मुखानंद नाट्यगृहाचे दरवाजे आठवड्यापुर्वीच खुले

Subscribe

दरवर्षी शिवेसनेचा दसरा मेळावा हा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे दसरा मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वर्च्युअल मार्गदर्शन केले होते. यंदा कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत असल्याने ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी जागा ठरली आहे. दरवर्षी दसरा मेळाव्याचा कार्यक्रम खुल्या मैदानात आयोजित करण्यात येतो परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यंदा १५ ऑक्टोबर रोजी माटूंग्याच्या षण्मुखानंद नाट्यगृहात होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नाट्यगृह, थिएटर मागील दीड वर्षांपासून बंद होते परंतु येत्या २२ ऑक्टोबरपासून राज्यातील नाट्यगृह, सिनेमागृह पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. २२ ऑक्टोबर पासून राज्यातील नाट्यगृह सुरु होणार असली तरी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी षण्मुखानंद नाट्यगृहाचे दरवाजे एक आठवड्यापुर्वीच खुले करण्यात येणार आहेत. यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद नाट्यगृहात घेण्यात येणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी जाहीर केले आहे.

- Advertisement -

शिवसेना आणि दसरा मेळावा असे समीकरण गेले ५५ वर्ष एकच आहे. यंदाचा दसरा मेळावा हा व्हर्च्युअल न होता प्रत्यक्ष होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागेचीही राऊतांनी घोषणा केली असून ५० टक्के उपस्थितीतीसह षण्मुखानंद हॉलमध्ये दसरा मेळावा होणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार षण्मुखानंद हॉल २२ ऑक्टोबरपासून सुरु होणं अपेक्षित होते परंतु शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी या हॉलचे दरवाजे आठवड्यापुर्वीच सुरु करण्यात येत आहेत. हॉलमध्ये प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होईल.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सिनेमागृह आणि नाट्यगृह अखेर सुरु करण्यात येत आहेत. २२ ऑक्टोबरला सिनेमागृह सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असून ५० टक्के उपस्थितीमध्ये सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दसरा मेळाव्यातही कोरोना नियमांचे पालन करुन ५० टक्के मुख्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

- Advertisement -

मागील वर्षी कोरोना संकटामुळे मर्यादीत लोकांच्या उपस्थितीमध्ये व्हर्च्युअल दसरा मेळावा घेण्यात आला होता. मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उपस्थिती लावून ऑनलाईन पद्धतीने शिवसेना दसरा मेळावा पार पडला. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असल्याने दसरा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमावलीनुसार ५० टक्‍के उपस्‍थितीत हा मेळावा पार पडेल. मेळाव्याला शिवसेनेचे नेते, मंत्री तसेच निवडक लोकप्रतिनिधी उपस्‍थित राहणार आहेत.

शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क येथे पार पडतो. मात्र गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे शिवसेनेला दसरा मेळावा ऑनलाइन घ्यावा लागला होता. या मेळाव्याला शिवसेना नेते स्वातंत्र्यवीर सावरकर स्‍मारकात उपस्थित होते. यंदाच्या दसरा मेळाव्यावरही कोरोनाचे सावट आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली असून रुग्णसंख्येत फार वाढ नाही. त्यामुळे येत्या १५ ऑक्टोबरला षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे.


हेही वाचा : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये मोजक्याच नेत्यांच्या उपस्थित होणार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -