घरताज्या घडामोडीमारुति सुझूकीची भन्नाट योजना, 'या' कार घ्या भाड्यावर आणि फिरा देशभर

मारुति सुझूकीची भन्नाट योजना, ‘या’ कार घ्या भाड्यावर आणि फिरा देशभर

Subscribe

जर वेगवेगळ्या महागड्या कारमधून भटकंती करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्वाची आहे.

जर वेगवेगळ्या महागड्या कारमधून भटकंती करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्वाची आहे. कारण देशात कार निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मारुती सुझूकी कंपनीने आलीशान गाड्या भाड्यावर देण्याची योजना सुरू केली आहे. यात वॅगन आर, स्विफ्ट, डिझायर, विटारा ब्रेजा, अर्टीगा, एरिना, इग्निस पासून नेक्सा गाड्यांचा समावेश आहे. यामुळे हौशी नागरिकांना आलिशान कारमधून देशभरात भटकंती करता येणार आहे.

सध्या ही योजना जयपूर, इंदौर, मंगळूरु आणि म्हैसूरमध्ये सुरू केले आहे. सध्या मारुती सुझूकी सब्सक्राईब ही योजना देशातील १९ शहरांमध्ये सुरू झाली आहे. यासाठी कंपनीने ओरिस्क ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लि , एएलडी ऑटोमोटिव इंडीया आणि माईल्स ऑटोमोटेव टेक्नोलॉजीजबरोबर करार केले आहेत. यासाठी कंपनीने शेअर धारकांना सूचनाही पाठवली आहे. ज्यात येत्या काळात अन्य शहरांमध्ये ही योजना सुरू करण्याबदद्ल सांगण्यात आले आहे. भारतीय बाजारात कार सब्सक्रिप्शन योजना ही नवीन आहे. यामुळे ती अपडेट करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मारुति सुझूकीचे ज्येष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना वाहन विकत घेण्याची गरज नाही. तर दरमहा एका ठराविक मासिक शुल्क भरून ग्राहक हे वाहन वापरू शकणार आहेत. यात गाडीच्या
विम्यापासून त्याच्या मेटेंनन्सचाही समावेश आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर ग्राहक भाड्याने घेतलेली कार कंपनीकडून विकतही घेऊ शकणार आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -