घरमहाराष्ट्रसंजय राऊतांची खासदारकी धोक्यात?; शिंदे गट आक्रमक

संजय राऊतांची खासदारकी धोक्यात?; शिंदे गट आक्रमक

Subscribe

मंत्री केसरकर यांनी माध्यमांशी मंगळवारी संवाद साधला. निवडणूक आयोगाचा निकाल दोन हजार कोटी रुपायांना विकत घेतला आहे. रेडकार्ड ठरले आहे. नगरसेवकांपासून सर्वाचे दर ठरले आहेत, असा आरोप संजय राऊत करत आहे, यावर मंत्री केसरकर म्हणाले, संजय राऊत पक्षाची बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांची राज्यसभेची खासदारकी का रद्द करू नये अशी नोटीस त्यांना द्यावी अशी मागणी मी स्वतः राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तरच अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसेल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

मुंबईः संजय राऊत हे शिवसेना पक्षाची बदनामी करत आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द का करु नये अशी नोटीस त्यांना देण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी सांगितले.

मंत्री केसरकर यांनी माध्यमांशी मंगळवारी संवाद साधला. निवडणूक आयोगाचा निकाल दोन हजार कोटी रुपायांना विकत घेतला आहे. रेटकार्ड ठरले आहे. नगरसेवकांपासून सर्वाचे दर ठरले आहेत, असा आरोप संजय राऊत करत आहेत, यावर मंत्री केसरकर म्हणाले, संजय राऊत पक्षाची बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांची राज्यसभेची खासदारकी का रद्द करू नये अशी नोटीस त्यांना द्यावी अशी मागणी मी स्वतः राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तरच अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसेल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

- Advertisement -

पुढे मंत्री केसरकर म्हणाले, खासदार संजय राऊत हे सध्या जामीनावर आहेत. त्यांना न्यायालयाने अटी, शर्ती घातल्या आहेत. तरीही ते बेताल वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आम्ही पोलीस, ईडी व न्यायालयात अर्ज करणार आहोत. तसेच जामीन रद्द करावा यासाठीही न्यायालयात अर्ज केला जाणार आहोत.

राऊत हे बाळासाहेबांशी एकनिष्ठ होते. ते उद्धव व आदित्य यांच्याशी कधीच एकनिष्ठ नाहीत. ते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती. पण शिवसैनिकांनी उठाव केला. आम्ही स्वंतत्र झालो. म्हणूनच शिवसेना वाचली. राऊत आणि राष्ट्रवादीचे काय बोलणे झाले मला माहित नाही. पण त्यांना शिवसेना संपावयची होती. आम्ही ती संपू दिली नाही, असे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

बदनामीला जशाच तसे उत्तर मिळेल

वारंवार आमची बदनामी केली जात आहे. आदर करतो म्हणून आम्ही गप्प आहोत. यापुढे गप्प बसणार नाही. भविष्यात बदनामीला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

लहान मुलासारखी आदळाआपट

ठाकरे गट हा लहान मुलासारखी आदळाआपट करत आहे. शिवसेना भवन माझं. पक्ष निधी माझा, असा दावा ते करत आहे. मात्र न्यायालयात तेच वेळ काढूपणा करत आहेत. आम्ही कधीच शिवसेना भवनावर दावा केलेला नाही. कारण ते आम्हाला मंदिरासारखे आहे. त्यामुळे सहानभूतीसाठी उद्धव ठाकरे खोटे दावे करत आहेत. एक दिवस महाराष्ट्रातील जनतेला सत्य कळेल, असा दावा मंत्री केसरकर यांनी केला.

व्हीप लागू होतो

शिवसेना पक्ष आणि चिन्ह या नावाने जे निवडून आले आहेत त्या सर्वांना व्हीप लागू होतो. आम्ही व्हीप जारी करणार आहोत. ज्यांना तो मान्य नसेल त्यांनी कोर्टात जावं. आमचं काहीही म्हणणं नाही, असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

२०१८ ची घटना बदलावी लागेल

आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा नेमका अजेंडा आहे मला माहिती नाही. पण उद्वव ठाकरे यांनी २०१८ मध्ये केलेली घटना आता बदलावी लागेल. ती घटना एकहाती अधिकार देणारी होती. त्यामुळे ती बदलावी लागेल. तसेच उद्वव ठाकरे पक्ष रद्द करू शकतात तर निवडणूक आयोगही रद्द करु शकतात, असा टोला मंत्री केसरकर यांनी हाणला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -