…तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती, अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया..

Sanjay Raut

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. या स्थगितीमागचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी राज ठाकरेंची तब्येत बरी नसल्याने हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या स्थगितीवरही भाष्य केलं आहे.

राज ठाकरेंनी ५ जूनचा दौरा रद्द केला आहे. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्की केलं असतं. कारण शेवटी अयोध्या आहे, तिथे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे.अयोध्येत शिवसेनेचं नेहमीचं स्वागत करण्यात आलं आहे. अयोध्येच्या जनतेनी साधू संतांनी आणि अयोध्येच्या राजकारणांनी उत्तर प्रदेशमध्ये नक्कीच स्वागत केलं आहे. परंतु मला असं समजलं आहे की, ते आता अयोध्येला जात नाहीयेत, असं संजय राऊत म्हणाले.

मी नामुष्की शब्द वापरणार नाही. त्यांच्या अडचणी मला माहित नाही. भाजपाने असं त्यांच्या बाबतीत का करावं? भाजपा नेहमीच महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी वापरून घेतं. पण यातून काही जणांना शहाणपण आलं तर बरं होईल. यातून राज्याच्या नेतृत्वाचं नुकसान होतं, असं राऊत म्हणाले.

आम्ही कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यांना दर्शनाला यायचं आहे ते येतील. त्यासाठी तयारी देखील सुरू आहे. १५ जूनला आदित्य ठाकरे येऊन रामलल्लांचं दर्शन घेतील. इस्कॉनच्या मंदिरालाही भेट देणार आहेत. इस्कॉन व्यवस्थापनाने त्यांना निमंत्रण दिलंय. त्यामुळे ते अयोध्येतल्या प्रमुख लोकांना भेटणार आहेत. अशा प्रकारे १५ जूनला आदित्य ठाकरेंचा दौरा ठरणार आहे.


हेही वाचा : Sandeep Deshpande At Shivteerth: जामीन मिळताच संदीप देशपांडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट