घरमहाराष्ट्रपालिका निवडणुकांमध्ये आघाडीसाठी स्वाभिमान सोडून तडजोड नाही - संजय राऊत

पालिका निवडणुकांमध्ये आघाडीसाठी स्वाभिमान सोडून तडजोड नाही – संजय राऊत

Subscribe

पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये आघाडी करण्यासाठी स्वाभिमान सोडून तडजोड करणार नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भोसरी येथे केलं. भोसरी येथे आज शोवसिनेच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा पार पडला. यावेळी राऊत यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोबत आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय, असं म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला.

पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. आघाडी आपली होईल का? त्या भानगडीत कशाला पडायचं? आपल्याला एकट्यांनं लढायची जास्त सवय आहे. आपण सगळ्या जागांवर लढण्याचा प्रयत्न करु, बघु ना, झाली युती तर…आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

आपण कशाला रेंगाळत बसायचं. आपण सगळ्या जागांची तयारी केली पाहिजे. उद्या आपल्या समोर चर्चेला बसतील. मग एवढ्या घ्या-तेवढ्या घ्या…ठिकेय. आपण प्रयत्न करु सन्मानाने आघाडी करण्याचा, पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी आपण तडजोड करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

मग ५० नगरसेवकांवर महापौर का नाही?

महापालिकेचे कुणाचे कितीही आकडे आले तरी महापौर आपलाच होईल… मी असं म्हणत नाही की आम्ही शंभर जागा जिंकू… पण मी मागे म्हटल्याप्रमाणे ५५ जागा आल्या तरी आमचा मुख्यमंत्री होतो तर चाळीस-पंचेचाळीसला किमान पिंपरी-चिंचवडचा महापौर झाला पाहिजे, आमची अत्यंत माफक अपेक्षा आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -