संजय राऊत म्हणतात, संदीप देशपांडे कोण? राहतात कुठे?

Sanjay Raut on Sandeep Deshpande | पत्रकारांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले. मात्र, संदीप देशपांडे कोण?असा प्रतिसावलच त्यांनी उपस्थित केला.

sanjay raut and sandeep deshpande

Sanjay Raut on Sandeep Deshpande | मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर आज शिवाजी पार्कात हल्ला झाला. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, भल्या पहाटे वॉकला गेलेले असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याने कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. याबाबत पत्रकारांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले. मात्र, संदीप देशपांडे कोण?असा प्रतिसावलच त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर क्रिकेटच्या स्टम्पने जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल

संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळीच हल्ला झालाय, याबाबत पत्रकारांनी आज संजय राऊतांना विचारले. यावर संजय राऊत म्हणाले की, संदीप देशपांडे कोण? राहतात कुठे? असा सवाल त्यांनी केला. सुरुवातील पत्रकारांना वाटलं राऊतांनी नाव नीट ऐकलं नाही. त्यामुळे पत्रकारांनी संदीप देशपांडेंच्या नावाच पुनरुच्चार केला. मात्र, संदीप देशपांडे कोण? असा सवाल त्यांनी पुन्हा उपस्थित केला. दरम्यान, हल्ले होणे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चांगलं लक्षण नाही. सामान्य माणूस असो वा इतर कोणीही सर्वांची सुरक्षा महत्त्वाची आहे, असंही पुढे संजय राऊत म्हणाले.

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळीच जीवघेणा हल्ला कऱण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी पार्कात (Shivaji Park) चार अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. क्रिकेटच्या स्टम्पने (Cricket Stump) डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सध्या ते सुखरुप असून पुढील उपचारांसाठी हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारांसाठी दाखल झाले असून शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – पटलं तर घ्या, नाही पटलं तर, संदीप देशपांडेंचे राऊतांना पत्र

मनसे नेते संदीप देशपांडे सातत्याने पक्षाची भूमिका घेत असतात. तसंच, विविध पक्षांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. आज ते सकाळी नेहमीप्रमाणे वॉकला गेले असता शिवाजी पार्कात चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. संदीप देशपांडे आज एकटेच वॉकला गेल्याने तबा धरून बसलेल्या भ्याड हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता, त्यामुळे त्यांना ओळखता आलेले नाही. मात्र, शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी तातडीने पावले उचलली असून तपास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हल्लेखोरांना लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.