घरताज्या घडामोडीसत्तेच्या पिंडाला विरोधकांचा कावळा शिवणार नाही; ठाकरेच मुख्यमंत्री राहणार

सत्तेच्या पिंडाला विरोधकांचा कावळा शिवणार नाही; ठाकरेच मुख्यमंत्री राहणार

Subscribe

संजय राऊतांनी सत्तेच्या पिंडाला भाजपचा कावळा शिवणार नाही, ठाकरेच मुख्यमंत्री राहणार, असं म्हटलं आहे.

राज्यात कोरोनाचं संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून राजकीय वर्तुळात खडाजंगी सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये”, अशा शब्दांत भाजपवर टीकेची तोफ डागली. राऊतांच्या टिकेला भाजपनेते ॲड. आशीष शेलार यांनी ‘लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना; मग आता लोकशाहीने वागा’, असे प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, आता ही शाब्दिक चकमक थांबण्याचं नाव घेत नाही आहे. संजय राऊतांनी सत्तेच्या पिंडाला भाजपचा कावळा शिवणार नाही, ठाकरेच मुख्यमंत्री राहणार, असं म्हटलं आहे.

“कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभं रहायला हवं. ही संपूर्ण देशाची लढाई आहे, तसेच विरोधी पक्षाला वाटत असेल की अशा पद्धतीने राजकारण केलं तर सत्तेच्या पिंडाला कावळा शिवेल, पण आता लॉकडाउनमध्ये कावळेही नाहीत. अशा अड्ड्यावर बसून जर कोण पत्ते पिसत असेल तर पिसावेत,” अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाबाधित पत्रकारांना भाजप सर्वतोपरी मदत करेल – चंद्रकांत पाटील


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २७ मेपर्यंत आमदार म्हणून निवडून येणं अनिवार्य आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे राज्यपालांच्या अधिकारातील एका जागेवरून ठाकरे यांची आमदार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय ९ एप्रिलला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार राज्यपालांना शिफारसही करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -