मेलेल्या कार्यकारिणीसमोर आमची खिल्ली उडवतायंत, भाजपच्या बैठकीवर संजय राऊतांची टीका

गुरुवारी पुण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेमध्ये कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या झोपलेल्या नेत्यांसमोर भाषण करत होते, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

Sanjay Raut's criticism of BJP meeting while mocking us in front of dead executive

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे लोक माझा सांगाती या पुस्तकाचे 2 मे ला प्रकाशन झाले. या पुस्तकातून त्यांनी राजकारणातील अनेक घडामोडींचा उल्लेख करत उलगडा केला आहे. पण या पुस्तकातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत देखील माहिती दिली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून ठाकरेंवर टीका करण्यात येत आहे. गुरुवारी पुण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेमध्ये कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या झोपलेल्या नेत्यांसमोर भाषण करत होते, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. (Sanjay Raut’s criticism of BJP meeting while mocking us in front of dead executive)

मेलेल्या कार्यकर्त्यांसमोर हे आमची खिल्ली उडवतात..
शरद पवार यांच्या “लोक माझा सांगाती” या पुस्तकातील उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील काही वाक्ये फडणवीस यांनी पुण्यातील भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत वाचून दाखवली. याबाबत संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाल की, “शरद पवारांच्या पुस्तकात देवेंद्र फडणवीसांवरही काही वाक्य आहेत. तीही त्यांनी वाचून दाखवायला हवी होती. खिल्ली कशावर उडवायला हवी? काल त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अर्धे लोक झोपलेले होते. झोपलेल्या लोकांसमोर बोललेत ना ते. त्यांचे मोठमोठे नेते झोपले होते, काही जांभया देत होते. अशा मेलेल्या कार्यकर्त्यांसमोर हे आमची खिल्ली उडवतात. पाहू ना”, अशी टीका संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले.

“ताबडतोब निवडणुका घ्या, मग कळेल..”
“पोपट कुणाचा उडतोय आणि कोणत्या वाघाची गर्जना होतेय हे कळेल त्यांना. कृषी उत्पन्न बाजार समितीत जे चित्र दिसलं ही फक्त झांकी आहे. ताबडतोब निवडणुका घ्या, मग पोपट कुणाचा मेलाय, हे ताबडतोब जनता दाखवेल तुम्हाला”, असे आव्हान राऊतांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

तसेच, “या देशात 36 राज्य आहेत. 36 मधल्या 16 चा आकडा काय घेऊन सांगताय? किती नावं घेऊ मी? यांचं डोकं ठिकाणावर आहे का? तुमच्याकडे काय आहे? एक गुजरात आणि उत्तर प्रदेश आहे. बाकी काय आहे तुमच्याकडे? तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं राज्य हिमाचल प्रदेशही तुम्ही जिंकू शकला नाहीत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.


हेही वाचा – Shivsena UBT : 2019 लोकसभेत जिंकलेल्या जागा लढवणारच, संजय राऊतांचा दावा