घरताज्या घडामोडीशिंदे गटाकडून शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, दीपक केसरकरांनी घेतली गोपनीयतेची शपथ

शिंदे गटाकडून शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, दीपक केसरकरांनी घेतली गोपनीयतेची शपथ

Subscribe

शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज राज्यपालांच्या दरबारी पार पडला. तब्बल ३९ दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात १८ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिंदे गटाकडून दीपक केसरकर, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

शंभूराज देसाईंची राजकीय कारकीर्द काय?

- Advertisement -

शंभूराज देसाई यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1966 रोजी मुंबईत झाला. बीकॉमपर्यंत त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यांनी पत्नी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे. तसेच त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. देसाईंच्या सामाजिक कार्याला 1986पासूनच सुरुवात झाली होती. साताऱ्यात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले.

1995-99 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या काळात सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1992-1997मध्ये पंचायत समिती पाटणचे ते सदस्य होते. 1992-2002मध्ये जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. 2014 आणि 2019मध्येही पाटणच्या मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून देत विधानसभेत पाठवलं.

- Advertisement -

अब्दुल सत्तारांची राजकीय कारकीर्द काय?

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 1 जानेवारी 1965 साली अब्दुल सत्तारांचा जन्म औरंगाबादच्या सिल्लोड गावातील एका सामान कुटुंबात झाला. सत्तार यांच्या राजकीय कारकिर्दीला 1984 पासून सुरूवात झाली.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 1984 साली ग्रामपंचायतची निवडणूक लढवून ते जिंकून आले. 2001 साली अब्दुल सत्तार हे विधानपरिषदेवर निवडून गेले. 2014 साली कॉंग्रेसच्या मंत्रीमंडळात ते काही महीने कॅबिनेट मंत्री झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

दीपक केसरकरांची राजकीय कारकीर्द काय?

18 जुलै 1955 रोजी जन्मलेल्या दीपक केसरकर यांनी सावंतवाडीचे नगराध्यक्ष, आमदार आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केला आहे. दीपक केसरकर यांच्या राजकीय वाटचालीची सुरूवात काँग्रेसमधून झाली होती. 1996 मध्ये त्यांनी सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर केसरकरांना शरद पवारांनी पाठिंबा जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

2009 मध्ये दीपक केसरकर हे सावंतवाडी-वेंगुर्ला या विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला. 2014 च्या लोकसभेत निलेश राणेंचा पराभव झाला होता. त्यामुळे केसरकरांनी राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून शिवसेनेचं शिवबंधन बांधलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत केसरकरांना तिसऱ्यांदा आमदार बनले. त्यानंतर शिंदे गटात त्यांना प्रवक्तेपद देण्यात आले आहे.


हेही वाचा : शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार : 18 जणांना राज्यपालांनी दिली शपथ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -