घरताज्या घडामोडीएकदा 'ते' झालं की आपण बाजूला व्हावं, ही माझी भूमिका - शरद...

एकदा ‘ते’ झालं की आपण बाजूला व्हावं, ही माझी भूमिका – शरद पवार!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलेली काही विधानं सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहेत.

गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी शरद पवारांनी आपण सक्रिय निवडणुका लढवणार नसल्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर देखील त्यांनी पक्षासाठी उभं राहात जोमाने प्रचार केला. विधानसभा निवडणुकीच्या आधी साताऱ्यात भर पावसात उपस्थितांसमोर छत्री न घेता भिजत बोलणाऱ्या शरद पवारांची प्रतिमा महाराष्ट्रात पक्षासाठी वेगळी सकारात्मकता निर्माण करून गेली आणि त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं भरघोस मतं दिली. मात्र, एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी केलेल्या विधानांमुळे शरद पवार आता सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांची विधानं त्याच दिशेने अंगुलीनिर्देश करणारी असल्याचं देखील बोललं जात आहे.

काय म्हणाले शरद पवार?

यावेळी बोलताना शरद पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. राज्यातलं सरकार सध्या योग्य मार्गावर असल्याचं ते म्हणाले. ‘सध्या महाविकासआघाडीच्या संमिश्र सरकारचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं धोरण अंगीकारलं आहे. कुणाच्या कामात ते फारसा हस्तक्षेप करत नाहीत. एका कार्यक्रमावर सगळ्यांचं एकमत झाल्यानंतर त्यात हस्तक्षेप न करण्याची भूमिका सरकारच्या नेतृत्वाने घेतली आहे. त्यामुळे कुणामध्येही नाराजी आणि कटुता येत नाही. उद्धव ठाकरेंच्या परीक्षेची वेळ असून आलेली नाही, त्याला अजून अवकाश आहे. पण त्यांचा मार्ग योग्य आहे’, असं म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं.

- Advertisement -

‘आपल्याला विचारलं, तरच मत द्यायचं’

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी केलेल्या काही विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ‘महाराष्ट्रातल्या सरकारचा रिमोट वगैरे काहीही माझ्या हाती नाही. आपण पुढच्या लोकांना उभं करण्यापर्यंत प्रोत्साहित करावं. सहकार्य करावं. एकदा ते स्वत:च्या पायावर चालायला लागले, की आपण बाजूला व्हावं. माझी इथे स्पष्ट भूमिका आहे की कुणी विचारल्याशिवाय आपण आपलं मत द्यायचं नाही. ज्याचा राज्यातल्या समाजावर, जनतेवर, विकासावर विपरीत परिणाम होत असेल, तर त्याची पक्षपातळीवर चर्चा करायची, सरकारमध्ये करायची नाही’, असं शरद पवार म्हणाले. ‘तरुणांना व्हिजन देऊन त्यांचं काम मी पाहात असतो. त्यांनी विचारलं, तरच सल्ला देतो. कारण नसता, न विचारता सल्ला देणं आणि सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणं योग्य नसतं, त्यामुळे तुमचा मान राहत नाही’, असंही पवार यावेळी म्हणाले.


हेही वाचा – ‘माझ्या बापानं रक्त गाळून पक्ष बांधलाय’; संतापात सुप्रिया सुळेंनी सुनावलं!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -